CoronaVirus News in Raigad : रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:32 PM2020-05-20T23:32:04+5:302020-05-20T23:32:51+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे.

CoronaVirus News in Raigad: Corona victims in Raigad | CoronaVirus News in Raigad : रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड

CoronaVirus News in Raigad : रायगडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड

Next

- आविष्कार देसाई।

अलिबाग : जिल्ह्यामध्ये खोपोली वगळता अन्यत्र कोठेही शवदाहिनीची व्यवस्थाच नाही. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची हेळसांड होत असल्याने मृतांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग असल्याने जिल्हा प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा लोंढा येत असल्याने कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईमधील रुग्णालयांची क्षमता संपल्याने आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातच उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अलिबागच्या सरकारी रुग्णालयामध्ये मंगळवारी दुपारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. मृताच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच अंत्यविधीला मृताचे शरीर कोणत्या वाहनातून न्यायचे, असा प्रश्न पडला होता. सरकारी रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उभ्या होत्या. मृताच्या नातेवाइकांनी तसेच मित्रांनी रुग्णवाहिका चालक-मालकांशी संपर्क साधला. मात्र, कोणीच मृतदेह नेण्यास तयार नव्हते. त्यामुळे बºयाच कालावधीपर्यंत मृतदेहासह नातेवाइकांना ताटकळत बसावे लागले होते. जिल्हा रुग्णालयाकडेही कसलीच व्यवस्था नसल्याने हाल झाले. काही कालावधीनंतर एक रुग्णवाहिका मिळाल्याने प्रश्न सुटला. नियमाने रुग्णवाहिकेतून मृतदेह नेता येत नाही, असे कारण सांगण्यात आले. मात्र, एरवी अशाच रुग्णवाहिकेतून मृतदेह नेल्याच्या घटना घडल्याचे कोणी नाकारू शकणार नाही.

‘रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही’
- दीड महिन्यापूर्वी उरण आणि पेण येथील रुग्णांवर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला होता; परंतु कोरोनाच्या भीतीमुळे
कोणीच पुढे येण्यास तयार नव्हते. त्यामुळे साध्या टेम्पो रिक्षातून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला होता. आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे संकट वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयांकडे शवदाहिनीची व्यवस्था नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. अलिबाग नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच शवदाहिनी घेण्यात येणार आहे.
-प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही वाहन तात्पुरत्या स्वरुपात शववाहिनीसाठी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुढे अशी अडचण येणार नाही.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Web Title: CoronaVirus News in Raigad: Corona victims in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.