शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 1:50 AM

coronavirus in Raigad : जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

- निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या भरणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय प्राथमिक केंद्र महाड, प्राथमिक केंद्र कशेळे अशा १६ ठिकाणी उपचार केंद्रे सुरू केली आहेत. उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू केली जाणार आहेत.नवीन केंद्रे सुरू केल्यानंतर तेथे तज्ज्ञ डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्ण कमी झाल्यानंतर कामावरून कमी केले होते. आता पुन्हा नवीन कर्मचारी वेळेत उपलब्ध करण्यासाठी आरोग्य प्रशासनाची धावपळ सुरू आहे.जिल्ह्यात ३३९ आरोग्य कर्मचारी भरती करण्याची आवश्यकता आहे. वेळेत नवीन कर्मचारी मिळाले नाहीत तर आहेत त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.आरोग्य विभागातआवश्यक मनुष्यबळपद     कर्मचारीवैद्यकशास्त्र तज्ज्ञ(एमडी)     १०मेडिकल मायक्रोबायोलाॅजिस्ट     १इंटेन्सिव्हिस्ट     ८एमबीबीएस     १५बीएएमएस     १७बीएचएमएस     १७बीयूएमएस     ०स्टाफ नर्स     ५०प्रयोगशाळा तंत्रज्ञ     ६कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १०एनएम     ४०बेडसाईड सहायक     ४०रिक्त पदे  लवकरच भरणार कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडत असलेला ताण पाहता जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाने जिल्हास्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे रिक्त पदे ही लवकरात लवकर भरण्यात येतील.- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड