Coronavirus : जेएनपीटी बंदर प्रशासन सज्ज, प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:47 AM2020-03-19T02:47:32+5:302020-03-19T02:48:27+5:30

विदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रूमेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून (पीएचओ) कसून तपासणी करण्यात येत आहे.

Coronavirus: JNPT port administration ready to prevent outbreak of Corona virus | Coronavirus : जेएनपीटी बंदर प्रशासन सज्ज, प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय  

Coronavirus : जेएनपीटी बंदर प्रशासन सज्ज, प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय  

Next

- मधुकर ठाकूर
उरण : जगातील २०० बंदरांशी जलमार्गाद्वारे व्यापारी संबंध असल्याने जेएनपीटी प्रशासनाकडून किमान बंदरातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. विदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रूमेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून (पीएचओ) कसून तपासणी करण्यात येत आहे. पीएचओने तपासणी केल्यानंतरच मालवाहू जहाजांना जेएनपीटी बंदरात लॅण्डिंगची परवानगी दिली जाते. कोरोना विषाणूंचा कोणत्याही परिस्थितीत प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पीएचओच्या तपासणीनंतरही विदेशी जहाजातील क्रूमेंबर्सना बंदरात उतरण्यास मनाई करण्यात येत असल्याची माहिती जेएनपीटीचे आरोग्य चिकित्सक डॉ. राज हिंगोराणी यांनी दिली.

केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून जेएनपीटी बंदरातून कोरोना विषाणूंचा संसर्ग होणार नाही, याची आणि केंद्र सरकारने कोव्हीड-१९ बाबत दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंना जन्माला घातलेल्या चीनच्या जहाजांवर जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. विशेषत: चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या दिवसांपासून कोरोनाबाधित देशांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये चीन, थायलंड, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, साउथ कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, इराण, नेपाळ, इटली, जर्मनी, स्पेन आदी १५ देशांचा समावेश आहे.

या कोरोनाबाधित यादीतील देशातून येणाºया मालवाहू जहाजांबाबत सतर्कता बाळगली जात आहे. या कोरोनाबाधित देशातून येणाºया मालवाहू जहाजांना १४ दिवस जेएनपीटी बंदरात येण्यास परवानगी दिली जात नाही. या १४ दिवसांत मालवाहू जहाज आणि त्या जहाजांवरील सर्व क्रूमेंबर्स तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरांच्या निरीक्षणाखाली भर समुद्रात जहाज नांगरून ठेवण्यात येते. या दरम्यान तीनही पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या निरीक्षणाखाली जहाज आणि त्या जहाजांवरील सर्व क्रू मेंबर्सच्या आरोग्याची कसून तपासणी केली जाते. आवश्यक त्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर आणि तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या परवानगी दिल्यानंतरच मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरात लॅण्डिंग केले जाते. 

मात्र, खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यानंतरही जहाजांवरील एकाही क्रू मेंबर्सना बंदरात उतरू दिले जात नाही, तसेच दररोज जेएनपीटी आणि जेएनपीटी अंतर्गत असलेल्या खासगी डीपी वर्ल्ड, जीटीआय, भारत मुंबई कंटेनर टर्मिनल, एनएसआयसीटी आदी बंदरांमध्ये येणाºया-जाणाºया जहाजांचा आणि जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या तपासणीचा संपूर्ण तपशीलही तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या माध्यमातून तयार करून केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो, अशी माहिती
डॉ. राज हिंगोराणी यांनी दिली.

जेएनपीटी बंदरात कोरोना विषाणूंचा संशयितांच्या तत्काळ विलीनीकरण आणि उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. संशयितांसाठी जेएनपीटी बंदरातच पोर्ट हेल्थ आॅफिसरच्या देखरेखीखाली तीन प्री-बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच काही इमर्जन्सी उद्भवल्यास जेएनपीटीच्याच कामगार वसाहतीतील ट्रामा सेंटरमध्येही आपत्कालीन व्यवस्था म्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे या क्षणापर्यंत तरी जेएनपीटी बंदरात एकही कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण आढळून आला नसल्याचे
डॉ. राज हिंगोराणी यांनी स्पष्ट केले.

जेएनपीटी बंदरात मालवाहू जहाजांची ये-जा सुरळीतपणे सुरू आहे. कोरोनाच्या भीतीचा बंदरातून होणाºया आयात-निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नाही.
- अमित कपूर, कॉन्झरवेटर कॅ प्टन, जेएनपीटी
 

Web Title: Coronavirus: JNPT port administration ready to prevent outbreak of Corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.