coronavirus: आरोग्य  कर्मचाऱ्यांत वाढल्या शारीरिक समस्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 01:26 AM2020-10-26T01:26:56+5:302020-10-26T07:17:29+5:30

Raigad News : रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला हाोता. त्यानंतर, कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वाढती  रुग्णसंख्येमुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झोप उडाली होती.

coronavirus: Increased physical problems among health workers, due to insufficient manpower | coronavirus: आरोग्य  कर्मचाऱ्यांत वाढल्या शारीरिक समस्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय दमछाक

coronavirus: आरोग्य  कर्मचाऱ्यांत वाढल्या शारीरिक समस्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय दमछाक

googlenewsNext

- अविष्कार देसाई 

रायगड -  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सरकारने तब्बल ६९ कोविड केअर सेंटर उभारले आहेत. फक्त ६४८ आरोग्य  कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्या आला आहे. सतत पीपीई किट वापरल्याने शारीरिक ॲलर्जीचे  प्रमाण वाढले आहे.  कामाच्या अतिरिक्त ताणामुळे  आरोग्य  कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

 रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला हाोता. त्यानंतर, कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वाढती  रुग्णसंख्येमुळे सरकार आणि प्रशासनाची चांगलीच झोप उडाली होती. जिल्ह्यात आरोग्याच्या फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने, त्या उभारण्यापासूनची तयारी सरकारसह प्रशासनाला करावी लागली. वाढणारी रुग्णसंख्या आणि उपलब्ध  मनुष्यबळाचा ताळमेळ लागत नसल्याने आजही डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण आहे.

त्यामुळे सुटी मिळवतानाही त्यांची कसरत होत आहे. शिवाय काही डॉक्टरांनाच कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या  जागी खासगी डॉक्टरांेना पाचारण
करावे लागले होते. सरकारी डॉक्टरांच्या मदतीने आजही खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सध्या कोरोनाचा कहर कमी  झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील  ताण काही अंशी कमी झाल्याचे  दिसून येते.

Web Title: coronavirus: Increased physical problems among health workers, due to insufficient manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.