कॉंग्रेसने हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाऐवजी आतंकवाद फोफावण्यावर खर्ची घातला - राज्यमंत्री श्रीपाद नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 15:53 IST2023-06-25T15:53:15+5:302023-06-25T15:53:33+5:30
मधुकर ठाकूर उरण : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वाधिक सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसने जनतेच्या करातुन मिळालेला हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या ...

कॉंग्रेसने हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाऐवजी आतंकवाद फोफावण्यावर खर्ची घातला - राज्यमंत्री श्रीपाद नाईक
मधुकर ठाकूर
उरण : स्वातंत्र्यानंतर देशाची सर्वाधिक सत्ता भोगणाऱ्या कॉंग्रेसने जनतेच्या करातुन मिळालेला हजारो कोटी रुपयांचा निधी जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या नावाखाली खर्ची घातला.मात्र काश्मीरचा विकास झालाच उलट सरकारच्या पैशांवरच आंतकवाद फोफावला.उलट मोदी सरकारने ९ वर्षांच्या सत्ताकाळात मोदी-शहांनी ३७० ,३५ कलम रद्द केले. काश्मीरचा विकास करुन काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे अवघ्या जगाला दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केले.
भाजपच्या वतीने मोदींच्या ९ वर्षातील कारकिर्दीतील लेखाजोखा मांडण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण येथे बुद्धिजीवी संवादाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रविवारी (२५) आयोजित करण्यात आला होता.जेएपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण परिसरातील वकिल, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेसवर राज्यमंत्री श्रीपाद नाईक घणाघाती टीका करताना स्वातंत्र्यानंतर तब्बल ६७ वर्षं देशात कॉंग्रेसने सत्ता भोगली. त्यांना देशाचा विकास मात्र करता आला नाही.मात्र कॉंग्रेसच्या सत्ताकाळात आठवड्यात एक घोटाळा उघडकीस येत होता.या उलट परिस्थिती मोदी सरकारची आहे.मागील ९ वर्षांच्या सत्ताकाळात एकही घोटाळा झाला नाही.किंबहुना एकही मंत्र्यांनी पाच पैशांचा ही घोटाळा केला नसल्याचा दावा केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केला.देशातील कोट्यावधी जनतेचा राममंदिराचा मुद्दा आस्थेचा मुद्दा बनला होता.मात्र मोदींनी कायद्याच्या चौकटीला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ न देता ,बगल जाऊ न देता राममंदिराच्या कामाला सुरुवात केली आहे. देशाची अर्थव्यवस्था १० नंबरवरुन ५ नंबरवर येऊन ठेपली आहे.येत्या काही काळात अर्थव्यवस्था ३ नंबरवर येईल असा विश्वास व्यक्त करताना भारताने जगाला आपल्या बळाची ताकद दाखवून दिली असल्याचा दावाही राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी मुंबई भाजपचे प्रदेशचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी यांनी मोदींचे सरकार हे संवेदनशील, सामर्थ्यवान, सुनियोजित या तत्त्वावर उभे आहे. देशाच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे.मोदी सरकारच्या मागील ९ वर्षांचा कालावधीतील कामकाजाचा लेखाजोखा मांडला.
यावेळी शेलार यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना मोदी-शहांची मुक्ती मोहम्मद यांच्याबरोबर
बसण्यामागील भुमिका राष्ट्रहिताची होती.तर उद्धव ठाकरे यांची मुक्ती मोहम्मद यांच्याशेजारी बसण्याची भुमिका मोदी हटाव, परिवार बचाव यासाठी असल्याची टीका आशिष शेलार यांनी भाषणातून केली.
यावेळी प्रास्ताविक करताना आमदार महेश बालदी यांनी मोदींच्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत जेएनपीए साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू झाली.परिसरात ४००० कोटींची उड्डाणपूल , आठ पदरी रस्ते तयार झाले.८००० कोटींच्या चौथ्या बंदराचे काम प्रगतीपथावर आहे.उरण-नेरुळ रेल्वे प्रकल्प मार्गी लागला आहे.१५० कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदराचे काम प्रगतीपथावर आहे. २० हजार कोटी खर्चाच्या नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामही अंतिम टप्प्यात असल्याचे बालदी यांनी सांगितले.