Holi 2020: पनवेल मधील सुकापुरात करोनासूर राक्षसाचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 22:57 IST2020-03-09T22:56:34+5:302020-03-09T22:57:15+5:30
भारतामध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतात या संदेशात्मक देखाव्याच्या माध्यमातुन नागरिकांना काळजी न करता सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Holi 2020: पनवेल मधील सुकापुरात करोनासूर राक्षसाचे दहन
वैभव गायकर
पनवेल: वाईट विचारांचे दहन करण्यासाठी सर्वत्र होळीका उत्सवाचे आयोजन सर्वत्र केले जाते.विधिवत पूजा केल्यानंतर होळीकेला अग्नी दिली जाते.याच धर्तीवर पनवेल मधील सुकापूर गावातील दे धक्का ग्रुपने जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसरुपी कोरोनासूर राक्षसाचे दहन केले.
भारतामध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतात या संदेशात्मक देखाव्याच्या माध्यमातुन नागरिकांना काळजी न करता सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी कोरोना व्हायरसला न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी या होळीद्बारे करण्यात आले आहे.विशेष म्हणजे कोरोना व्हायरस जनजागृती करण्यासाठी याठिकाणी फलक देखील उभारले आहे.या फलकावर कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबविण्यासाठी काय उपाययोजना राबवावी या सूचना देण्याचे आल्या आहेत.दे धक्का ग्रुपने राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.