शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:50 IST

लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली.

रायगड - जिल्ह्यातील राजकारणात सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांचा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीमुळे शिगेला पोहचला आहे. त्यात मतदानाच्या दिवशीच महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. याठिकाणी मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे समर्थकांमध्ये हाणामारी झाली. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड केली. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या सुरुवातीपासून काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला होता. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते. त्याच ठिकाणी विकास गोगावले समर्थक आणि राष्ट्रवादी समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. सुशांत जाबरे यांनी शिंदेसेनेतून बाहेर पडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज मतदानाच्या दिवशी हे आमनेसामने आले तेव्हा समर्थकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सुशांत जाबरे यांना गोगावले समर्थकांकडून मारहाण झाली. जाबरेंनी बंदूक दाखवून विकास गोगावलेंना धमकावल्याचेही बोलले जात आहे. 

याबाबत सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुकीत शांतता राहणे सर्वच राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. मात्र तिथले युवा नेते म्हणवणारे आज सकाळपासून प्रत्येक मतदान केंद्रावर स्वत: आत जात होते. तिथे निवडणूक अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होते. लोकशाहीत हे चुकीचे आहे. मतदान केंद्रावर जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यापुरता मर्यादित असतो. इतरांना तिथे प्रवेश नसतो. मात्र तरीही महाडसारख्या सुसंस्कृत शहरात अशी गुंडगिरी होतेय, धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा माणसं या प्रवृत्तीकडे वळतात. ज्यांची प्रवृत्ती गुन्हेगारीची आहे त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार, प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. मतदान केंद्रावर हे स्वत: महाशय जातात, हे मी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातले होते. तिथल्या पोलीस निरिक्षकांच्या कानावर घातले. जो त्या शहरातील मतदारही नाही तो मतदान केंद्रावर जात होता. लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली.

दरम्यान, रायगडमधील निवडणुका सर्वश्रूत आहेत. महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. नेत्यांनी हे टाळले पाहिजे होते. महायुतीत असताना खालच्या पातळीवर जी भाषणे झाली, टीकाटीप्पणी झाली त्यामुळे कार्यकर्ते पेटून उठले. त्यामुळे नेत्यांची जबाबदारी होती. मला या घटनेची माहिती नाही. परंतु प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत असेल ती लढाई मैत्रीपूर्णच झाली पाहिजे. तिथली वस्तूस्थिती काय हे विचारून घेतल्यानंतर मी बोलेन. लोकसभा, विधानसभेची आठवण नेत्यांनी ठेवली पाहिजे. सुनील तटकरेंनी त्यांची बाजू मांडली तशी भरत गोगावले यांचीही काही बाजू असेल. तेदेखील योग्य असेल. कार्यकर्ते एकमेकांना भिडणार नाही याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे होती. हे वातावरण युतीसाठी पोषक नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts in Mahad Between Shinde Sena, NCP; Vehicles Vandalized

Web Summary : Mahad witnessed a clash between Shinde Sena and NCP workers during Nagar Parishad elections. Supporters of Gogawale and Jabre clashed, leading to vandalism and accusations of intimidation. Senior leaders appeal for calm.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंतNCPराष्ट्रवादी काँग्रेसLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक