शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडीमध्ये गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिक संतप्त

By admin | Updated: May 6, 2017 06:08 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन लग्नसराईमध्ये ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा माती मिश्रित असल्याने नागरिकांना बिसलेरी, किंवा बॅरेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सात हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येला काळनदीवरील जॅकवेलद्वारे व एमआयडीसीकडून पाणी घेऊन नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेले दोन दिवस बिरवाडीमध्ये नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी बिसलेरी बाटल्या, किंवा बॅरेलमधील पाणी वापरावे लागत आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्य सेवकांनी या पाण्याचे नमुने तपासणीकरिता ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याबाबत बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी. एस. म्हामुणकर यांच्याशी संपर्क साधला असता, बिरवाडी काळनदीवरील जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम सुरू असून, पाण्यामध्ये टीसीएल पावडर व तुरटी फिरविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू आहे. बिरवाडीमधील नागरिकांकरिता ‘राष्ट्रीय पेय जल’ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करून त्यांची पाण्याची समस्या मार्गी लावण्याकरिता सरकारने पाच कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. मात्र, त्या योजनेचे काम अजून परिपूर्ण झाले नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पी.एस. म्हामुणकर यांनी दिली आहे.