जीर्ण वृक्ष अंगावर कोसळून दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:31 IST2019-01-16T23:30:55+5:302019-01-16T23:31:52+5:30
ओमप्रकाश राठोड हे दुचाकीवर रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली उभे होते

जीर्ण वृक्ष अंगावर कोसळून दुचाकीस्वार जखमी
खोपोली : शिळफाटा येथील एचडीएफसी बँकेसमोरील जुना वृक्ष अचानक अंगावर कोसळल्याने वृक्षाखाली उभा असलेला दुचाकीस्वार जखमी झाला. त्यांना तातडीने जाखोटीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ओमप्रकाश राठोड (५५, रा. मोगलवाडी) आणि त्यांचे सहकारी गोपाल पालीवाल (रा. वर्धमाननगर) हे दोघेही बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास खोपोलीवरून दुचाकीवर कंपनीमध्ये कामासाठी जात होते. गोपाल पालीवाल एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये गेले असता ओमप्रकाश राठोड हे दुचाकीवर रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली उभे होते. या दरम्यान काही क्षणांतच रस्त्यालागत असलेले जीर्ण वृक्ष राठोड यांच्या आंगावर कोसळला. या वेळी काही मदतनिसांनी सहकार्य केल्याने राठोड यांना जाखोटीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. या वेळी मदतीला कोणीही आले नसल्याची खंत राठोड यांनी व्यक्त के ली.
या दुर्घटनेत ओमप्रकाश राठोड यांच्या पाठीच्या कण्याला, तसेच हात आणि पायाला गंभीर मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.