शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या दिवशीही नागरिकांची ससेहोलपट

By admin | Updated: November 16, 2016 04:42 IST

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सातव्या दिवशीही नागरिकांची त्रेधातिरपीट सुरूच आहे.

श्रीवर्धन : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सातव्या दिवशीही नागरिकांची त्रेधातिरपीट सुरूच आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बँकांमध्ये प्रचंड गर्दी असून आजच्या सातव्या दिवशीही पैसे भरण्यासाठी बँकांमध्ये भली मोठी रांग लागली होेती. रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्दचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर झाला आहे, मात्र याचा सर्वाधिक फायदा ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांना झाला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने करापोटी आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त कर जमा केला आहे.घरपट्टी, पाणीपट्टी, वृक्षकर, रोजगार हमी कर, पाणी नळजोडणी, पाणीपुरवठा अनामत, रस्ता खुदाई शुल्क, सरकारी शिक्षण कर आदी करापोटी श्रीवर्धन नगरपालिकेत आतापर्यंत १५ लाखांपर्यंत रक्कम जमा झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली असली तरी यातून काळा पैसा बाहेर येणार आहेच, पण सर्वसामान्यांचे मात्र हाल झाले आहेत. ५०० च्या नोटा स्वीकारत नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये बालकांनाही प्राण गमवावे लागत आहेत. या चिंतेने आता वृध्दांनी, महिलांनी रांगांचा धसका घेतला आहे. सरकारने यावर त्वरित उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. पैसे स्वीकारण्यासाठी बँकांमध्ये जादा काऊंटर सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)