शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रसायनाने भरलेला टँकर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:16 IST

दोन तास वाहतूककोंडी : टँकर फुटल्याने नागरिक भयभीत

खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गुरुवारी रसायनाने भरलेल्या टँकरला अपघात होऊन टँकरने पेट घेतला. चालकाने उडी मारल्यानंतरही टँकर रस्त्यावर ५० मीटरपर्यंत पुढे गेला आणि एका पुलावरून खाली ताकई - आडोशी रस्त्यावर कलररूफ कंपनीजवळ कोसळला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी टँकर जळून पूर्णत: खाक झाला. यामुळे मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर व ताकई - आडोशी रस्त्यावर वाहतुकीची दोन तास कोंडी झाली होती.टँकर खाली कोसळताना तो एका ट्रान्सफॉर्मरवर पडला. त्यामुळे आडोशी - ढेकू परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. टँकर फुटल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला.देवदूत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य रुग्णालयाचे पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे पथक, महामार्गा पोलीस, पो.नि. जगदीश परदेशी यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली तर टाटा स्टील, रिलायन्स, एचपीसीएल, खोपोली फायर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आयएनएसचे अधिकारी एस.जी. साठे पथकासह उपस्थित होते. आयएनएस शिवाजी पथक टँकरमधून पडलेल्या रसायनाचा अभ्यास करणार असून या रसायनाचा भविष्यात ग्रामस्थांना त्रास होणार नाही ना? याचीही तपासणी करणार आहे.