तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 22:07 IST2023-12-28T22:07:02+5:302023-12-28T22:07:02+5:30
पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील चेम्सपेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज(दि.28) रोजी रात्री 8 च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे ...

तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला आग
पनवेल: तळोजा एमआयडीसीमधील चेम्सपेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज(दि.28) रोजी रात्री 8 च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहीत मिळताच एमआयडीसीमधील अग्निशमन दलासह सिडकोच्या अग्निशमन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग. pic.twitter.com/MdaBjzCSzh
— Lokmat (@lokmat) December 28, 2023
या आगीत कंपनीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या कंपनीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीदेखील आगीच्या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.