शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीपीचे विस्तारीकरण सुरू; क्षमता २२ एमएलडीवरून २७ इतकी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:17 IST

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तळोजा एमआयडीसीपैकी एक असलेल्या सीईटीपीचे विस्तारीकरण होणार आहे.

पनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तळोजा एमआयडीसीपैकी एक असलेल्या सीईटीपीचे विस्तारीकरण होणार आहे. या कामाला गुरुवारी सुरुवात झाली असून एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता एन. जी. वानखेडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे सीईटीपीची क्षमता २२ एमएलडीवरून २७ एमएलडी होणार आहे.तळोजा सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविणाऱ्या संस्थेच्या अडथळ्यामुळे केंद्राचे विस्तारीकरण मागील वर्षभरापासून रखडले होते. एमआयडीसीच्या नियंत्रणाखाली विस्तारीकरण व्हावे म्हणून तळोजा एमआयडीसीला पुनर्जीवित करून प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यासाठी ७३.५ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार होती. यामध्ये सीईटीपीचा प्रकल्प पुन्हा नव्याने उभारून पुढील पाच वर्षांसाठी देखभाल, दुरुस्ती करण्याच्या कामासाठी देण्याचे ठरले. ठेका पद्धतीने करण्यात येणाºया कामात दोन कंपनीला कंत्राट मिळाले होते. अखेर सीईटीपी आणि एमआयडीसीत सामंजस्य झाल्यानंतर ठेकेदार अँक्वाकेम आणि के. डी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कार्यादेश देण्यात आले. भूमिपूजन कार्यक्र माला सहायक अभियंता आनंद गोगटे, कनिष्ठ अभियंता दीपक बोबडे पाटील, तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडके, के. डी. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. डी. पाटील, अ‍ॅक्वाकेमचे व्यवस्थापकीय संचालक एम. डी. नाईक आदी उपस्थित होते.सध्या २२ एमएलडी क्षमता असलेल्या प्रकल्पाची क्षमता ५ एमएलडीने वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ महिन्यांच्या कालावधीत प्रकल्पबांधणीचे काम पूर्ण करून पुढील पाच वर्षे प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच ठेकेदार कंपन्यांची असणार आहे. या भागातील प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आपल्यापुढे असून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करावा, असे मत अधीक्षक अभियंता एन.जी. वानखेडे यांनी व्यक्त केले.एमआयडीसीमधील प्रदूषण नियंत्रणात येणारतळोजा एमआयडीसीमध्ये सध्याच्या घडीला प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. या प्रकरणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लवादामध्ये धाव घेतली होती. सीईटीपीच्या विस्तारीकरणामुळे प्रदूषण कमी होणार आहे. दूषित पाण्यावर प्रक्रि या करण्याची क्षमता वाढणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडMIDCएमआयडीसी