शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:29 AM

पालकमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने एनडीआरएफच्या निकषात बदल करून सुधारित निकषानुसार मदत करावी, अशी मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय पथकाचे अध्यक्ष रमेश कुमार गंटा यांना निवेदनाद्वारे केली.रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे आंतर मंत्रालयीन पथक मंगळावारपासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे. आदिती तटकरे यांनी पथकाची भेट घेऊन रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. १८९१ नंतरचे सर्वात मोठे असे चक्रीवादळ ३ जून, २०२० रोजी आले होते. ‘फयान’ वादळाचा मुंबईवर मोठा परिणाम झाला होता. एनडीआरए आणि एसडीआरएफचे सध्याचे निकष ‘निसर्ग’सारख्या चक्रीवादळाला पूरक नाहीत. केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी भरपाई ही सध्याच्या निकषानुसार अपुरी आहे, असे तटकरे यांनी पथकाच्या निर्दशनास आणून दिले.भविष्यात ‘निसर्ग’सारखे चक्रीवादळ पुन्हा आल्यास विस्थापित लोकांसाठी कायमस्वरूपी निवारा घरे ही काळाची गरज आहे. म्हणून निकषात बदल करून अंतर्गत निवारा गृहांच्या बांधकामांना मंजुरी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी केंद्रीय पथकातील बी.के.कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस.मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषिमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते वाहतूक, महामार्ग, मुंबई) हे उपस्थित होते.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ‘घरगुती पर्यटन’ ही संकल्पना पूर्णत: कोलमडली आहे. कोकणातील घराजवळील परस बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परस बागेसाठी विशेष मदतीचे पॅकेजही केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळAditi Tatkareअदिती तटकरे