शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

ब्रिटिशकालीन पडलेला पूल तसाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:43 AM

नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते.

- विजय मांडे कर्जत : नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेला जुना लहान पूल २७ मार्च रोजी कोसळला होता. त्या पुलाची तत्काळ बांधणी करून पावसाळ्यापूर्वी खुला झाला पाहिजे असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिले होते. मात्र, प्रशासनाने कागदी घोडे नाचवत केवळ प्रस्ताव सादर करण्याचे काम दीड महिन्यात केले आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नवीन पूल बांधून होण्याची शक्यता मावळली आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील ७ आदिवासी वाडीमधील लोकांचा तसेच मोहाचीवाडीमधील लोकांचा वहिवाटीचा रस्ता असलेला पूल २७ मार्च रोजी दुपारी कोसळला होता. सदर पूल कोसळल्याने तेथील लोकांची गैरसोय होत असल्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे त्या भागातील ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केली होती. त्यानंतर या पुलाची मालकी असलेल्या रायगड जिल्हा परिषदेने तत्काळ अंदाजपत्रक तयार करून पावसाळ्यापूर्वी पूल खुला होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार सुरेश लाड यांनी दिल्या होत्या. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी तिसऱ्याच दिवशी पाहणी करून पावसाळ्यापूर्वी पुलाची बांधणी पूर्ण झालेली असेल असे आदेश दिले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार यांनी काम वेळेत पूर्ण होईल, असे आश्वासन उपाध्यक्षांना दिले होते.मात्र, मागील दीड महिन्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कागदी घोडे नाचविण्याशिवाय काहीही केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.अद्याप या कामाची निविदा देखील निघाली नसून पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना बांधकाम विभाग करीत असलेल्या दिरंगाईमुळे नेरळ मोहाचीवाडी भागातील लोकांचे पावसाळ्यात हाल होणार हे जवळपास नक्की झाले आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचे स्पष्ट होत असताना त्या ७ आदिवासी वाड्या आणि मोहाचीवाडीमधील लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणवून घेणाºया नेरळ ग्रामपंचायतीकडून काय कार्यवाही होते? याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.नेरळ येथील २७ मार्च रोजी तुटलेला पूल अजूनही तसाच आहे.

टॅग्स :Raigadरायगड