शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:18 IST

एसटी बस बंद; दुहेरी संकटामुळे ग्रामस्थांची काेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग-रोहा रस्त्यावरील खानाव वढाव येथील पूल सोमवारी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच चौलमार्गे अंदोशी येथील मोरी तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. या दुहेरी संकटामुळे नागरिकांची कोंडी झाली होती.  अलिबाग-रोहा रस्त्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वढाव येथील पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण खचला आहे. आधीच अलिबाग रोहा रस्त्यावर नवेघर आणि सुडकोली येथील पूल निकामी झाल्याने अलिबाग रोहा एसटी बस बंद करण्यात आलेली आहे. अलिबाग आगारातून अलिबाग ते महानपर्यंत बस सोडली जात होती. त्यामुळे काहीसा दिलासा प्रवाशांना मिळाला होता. एसटी विभागाने बामणगावपर्यंत बस सोडली आहे. अलिबाग एसटी स्थानकात रामराजकडे जाणारे प्रवासी एसटीची वाट पाहत होते. त्यामळे गर्दी झाली होती. एसटी सुटणार नसल्याने पर्यायी वाहनाने प्रवासी पुढील प्रवासासाठी निघाले.

पर्यायी मार्गावरील पूलही खचल्याने प्रवाशांचे हालवढाव येथील पूल आणि रस्ता खचल्याने अलिबाग रोहा हा पूर्णतः रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वावे, रामराज येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत. पर्यायी मार्ग असलेल्या चौलमार्गे वावे ते महान या रस्त्याने वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, आंदोशी येथीलही पूल खचल्याने या मार्गाने जाणारी वाहतूकही बंद आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alibaug-Roha Bridge Collapses, Traffic Halt, Commuters Stranded.

Web Summary : The Alibaug-Roha road is blocked after a bridge collapse near Khanav Vadhaw. Daily commuters face hardship. An alternative route via Chowk is also closed due to a damaged bridge at Andoshi, compounding travel woes.
टॅग्स :alibaugअलिबाग