क्रिकेटच्या वादातून शाळकरी मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 06:26 IST2021-01-11T06:25:47+5:302021-01-11T06:26:08+5:30

कुंभारआळी सद् गुरू पार्क येथे शनिवार सायंकाळी सोसायटीमधील मुले क्रिकेट खेळताना लहान मुलांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जाऊन रागाने एका छोट्या खेळाडूने प्रेम याच्या डोक्यात  बॅट मारली.

Boy dies in cricket dispute | क्रिकेटच्या वादातून शाळकरी मुलाचा मृत्यू

क्रिकेटच्या वादातून शाळकरी मुलाचा मृत्यू

पेण :   खेळातील किरकोळ वादात बॅटने मारल्याने पेण शहरातील प्रेम मंगेश दळवी या १३ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. 

कुंभारआळी सद् गुरू पार्क येथे शनिवार सायंकाळी सोसायटीमधील मुले क्रिकेट खेळताना लहान मुलांमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जाऊन रागाने एका छोट्या खेळाडूने प्रेम याच्या डोक्यात  बॅट मारली. यात प्रेमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. १३ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी रात्री नेण्यात आले तेव्हा नागरिकांनी गर्दी केली होती. स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
 

Web Title: Boy dies in cricket dispute