शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:05 IST

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे नाही प्रमुख नेता;  सव्वालाख मतदार वाढले, फायदा कोणत्या पक्षाला? कोणाचे गणित बिघडणार

-वैभव गायकर

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : स्थापनेनंतर पनवेल महापालिकेत पहिल्या निवडणुकीपासून भाजपचे वर्चस्व आहे. या खेपेला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळ्यात जेलमध्ये असून दुसरे नेते जे.एम. म्हात्रे हे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे पक्षाचा प्रमुख नेत्यासाठीचा शोध सुरू आहे. तर शिंदेसेना, उद्धवसेना हे एकसंघ असल्यापासून व काँग्रेस व राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी कायम झगडावे लागले. 

सिडकोने विकसित केलेल्या शहरात महापालिकेच्या स्थापनेनंतर हक्काची स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली. पहिल्या महापौर म्हणून डॉ. कविता चौतमोल यांना संधी मिळाली. आरक्षणामुळे मागासवर्गीय महिलेच्या हाती सूत्रे दिली. नंतरच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही चौतमोल यांनाच आरक्षण बदलूनही कायम केले. 

सत्ताधारी राजवट संपल्यावर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुखनंतर सध्या मंगेश चितळे प्रशासक म्हणून काम पाहात आहेत.

कोणते मुद्दे निर्णायक? 

पनवेल पालिका हद्दीत खारघर, कामोठे, कळंबोली, रोडपाली आणि तळोजामधील प्रदूषण, वाढीव मालमत्ता कर, अनियमित पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील समस्या हे मुद्दे निर्णायक ठरतील.महापालिकेची स्थापना भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने झाली. पहिल्याच २०१७ सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. नंतरच्या काळात शेकापच्या १० नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला. 

महापालिकेत कुणाची होती सत्ता?

भाजप     ५१शिवसेना     २३राष्ट्रवादी     २काँग्रेस     २

विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील महापालिका असलेल्या शहरात अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी आहे. त्यामुळे या शहराच्या महापालिकेवर कोणाची सत्ता येते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा