शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

फणसाडमधील प्रगणनेत आढळली जैवविविधता

By admin | Updated: May 13, 2017 01:14 IST

बुद्धपौर्णिमेनिमित्त मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ४० स्वयंसेवकांसह उपवनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांची प्रगणना केली.

संजय करडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/मुरुड : बुद्धपौर्णिमेनिमित्त मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ४० स्वयंसेवकांसह उपवनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांची प्रगणना केली. ११ ठिकाणी करण्यात आलेल्या प्रगणनेत १८ प्रकारचे वन्यप्राणी आढळून आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली. यामध्ये बिबटे२, सांबर १, भेकर २, रानडुक्कर ६, शेकरू ३, पिसोरी १, काळे मांजर २, रानमांजर १, नाग १, माकडे १३, वानर १४, मोर १५, खार २ यांचा समावेश आहे. याशिवाय पक्ष्यांमध्ये ब्राऊन हेडेड बारबेट १, पोम्पाडोर ग्रीन पीजन २, भृंगराज रॅकेट टेल्ड ड्रोंग १, पाँड हेरॉन ३, ग्रे हार्नबील १, मॉटल्ड वुड आऊल १, स्किटरिंग फ्रॉग, बॉनेट मॅकॉक २, क्रि मझन रोझ १, कॉमनरोझ १, प्लेन टायगर १,कॉमनमॉरमॉन १, बार्कमॅन्टीस १,एमेराल्ड डव १, कोतवाल १, जंगल क्र ो ३, जेडर्न नाईटजार १, टिटवी ७, हरियल १, भारद्वाज ३, अल्पाईनिस्वफ्ट २, लालमिशीचा बुलबुल १, लालबुडबुड्या १, ब्राह्मणीखार २ या विविध पक्ष्यांचा अंतर्भाव आढळला. भारतातील बहुतांशी अभयारण्ये तथा राष्ट्रीय उद्याने राजे-महाराजे व संस्थानिक यांनी त्यांच्या हौसेखातर राखून ठेवलेल्या क्षेत्रांपैकी असल्याचे आढळून येते. मुरु ड तालुक्यातील केसोलीचे जंगल हे जंजिऱ्याच्या नबाबाचे पारंपरिक संरक्षित शिकार क्षेत्र म्हणजेच आजचे फणसाड अभयारण्य होय. तब्बल ५४ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरलेले मुरु ड व रोहा तातुक्यातील फणसाड अभयारण्य १९८६ साली अधिसूचित झाले. गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश आणि २७ ठिकाणी बारमाही पाण्याचे असलेले हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. या अभयारण्यात ७१८ प्रकारचे औषधी गुणधर्माने युक्त वृक्ष, १७/१८ प्रकारचे सस्तन प्राणी, २७ प्रकारचे सर्प, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, शंभराच्या घरात ब्यू मॅरिमान, मॅप आदी प्रकारची फुलपाखरे, वनसंपदा पर्यटक तसेच निसर्गप्रेमींना भुरळ घालते. फणसाडच्या डोंगरांची उंची माथेरान, महाबळेश्वर एवढी नसली तरी येथील वनस्पतीत तीच घनता आढळते हे वैशिष्ट्य. वृक्षसंपदेमध्ये ऐन, साग, किंजळ, घावडा, अंजनी, आंबा, करंज, हेद, काजू, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, उंबर,खवस,कोकम,जारूळ,मोहा,कळंब ,अर्जुन आदी प्रकारची झाडे आढळून येतात. वनामध्ये मोठमोठ्या वेली असून ५ ते ६ फुटाची गारंबीची हिरवी कंच शेंग आकर्षण ठरते. प्राण्यांमध्ये बिबट्याव्यतिरिक्त सांबर, भेकर, रानडुक्कर ,सायाळ, पिसोरी तसेच शेकरू (मोठीखार) ही आढळतात. बुद्धपौर्णिमेप्रसंगी आयोजित प्रगणनेत सहभागी निसर्गप्रेमी स्वयंसेवकांनी टॉर्च, कॅमेरे तसेच उंच मचाणाचा वापर करीत शुभ्र चांदण्यारात्रीत जंगल मुशाफिरी करत मनमुराद आनंद लुटल्याचे निसर्गप्रेमी सर्वेश अभ्यंकर यांनी सांगितले.