शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

करंजा बंदर उभारणीत निधीचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:55 IST

काम रखडण्याची शक्यता । दिरंगाईमुळे ८६ कोटींच्या खर्चाचे काम पोहोचले २३६ कोटींवर

मधुकर ठाकूर 

उरण : राज्यातील मच्छीमारांसाठी मुंबई येथील ससून डॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्ययावत, अत्याधुनिक बंदर उभारण्यात येत आहे. पश्चिम किनाऱ्यावरील या बंदरात एक हजार मच्छीमार बोटी लॅण्ड होण्याच्या क्षमता राहणार असून निधीअभावी गेल्या सात वर्षांपासून बंदराचे काम संथगतीने सुरू आहे.

सुरुवातीच्या बंदर उभारणीसाठी ८६ कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त वाढते काम आणि तांत्रिक अडचणींमुळे २०१९पर्यंत खर्चात आणखी १५० कोटींची भर पडून ते २३६ कोटींपर्यंत पोहोचले आहे. अतिरिक्त १५० कोटींची रक्कम केंद्र व राज्य सरकार मिळून निम्मी-निम्मी देण्याची घोषणा करून त्यास मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र यापैकी फक्त ४६.३० कोटींचाच निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीनंतर करंजा बंदर उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात झाली. मात्र महाराष्ट्रात नव्याने आलेले राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे उर्वरित रक्कम मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.मात्र गेल्या सात वर्षांपासून निधीअभावी रखडत चाललेले बंदराचे काम आणखी रखडण्याची भीती मच्छीमार आणि व्यावसायिकांनाही वाटू लागली आहे.मुंबईत मच्छीमारांसाठी ससून डॉक आणि भाऊचा धक्क्याजवळील कसारा बंदर (न्यू फिश जेट्टी ) अशी दोन बंदरे आहेत. कसारा बंदर आधीच गुजराती मच्छीमारांसाठी सरकारने आंदण देऊन टाकले आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यांतील हजारो मच्छीमारांसाठी मुंबईतील ससून डॉक हेच एकमेव बंदर उरले आहे. तिन्ही जिल्ह्यांतील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदराच्या आश्रयाला येतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी ससून डॉक बंदरातच डिझेल, बर्फ आणि इतर आवश्यक साधनसामग्री बोटीत भरण्यात येते. मासेमारी करून परतल्यानंतर याच बंदरात मासळी उतरवितात. लिलाव करून विक्री करतात.ससून डॉक बंदराची ७०० मासेमारी बोटी लागण्याची क्षमता आहे. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यांतील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदरात लँड होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने ससून डॉक बंदरात मच्छीमार बोटी येत असल्याने मोठी गर्दी होते. यामुळे बंदरावर मोठा ताण पडत असल्याने मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ससून बंदरावरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा बंदरात अद्ययावत, सर्व सोयींयुक्त आधुनिक बंदर उभारण्यात यावे, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात होती. या मागणीसाठी करंजा मच्छीमार संस्थेने राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शासनानेही मच्छीमारांच्या मागणीची दखल घेऊन करंजा खाडीकिनारी एक हजार मच्छीमार बोटी लागण्याच्या क्षमतेचे अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. करंजा बंदराचे दोन टप्प्यात काम करण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यातील २५० मीटर लांबीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र समुद्राच्या तळाशी अवघड खडक लागल्याने ते रखडले होते. खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त १५० कोटी खर्च शासनाकडून वेळेत उपलब्ध होऊ शकला नाही.

करंजा मच्छीमार बंदराचा विस्तार आणि मच्छीमार बांधवांचा विकास झाला पाहिजे, यासाठी करंजा मच्छीमार संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिवदास नाखवा, माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी जेएनपीटीचे तत्कालीन विश्वस्त तथा विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून ७५ कोटी रुपये व महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ७५ कोटी रुपये असा एकूण १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करंजा-उरण येथील जाहीर सभेत केली. त्यामुळे २०१८ मध्ये रखडलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला.25,000नागरिक, व्यावसायिकांना मिळणार रोजगाराची संधीच्सहाशे मीटर लांबीच्या करंजा बंदरात आधुनिक फिश लॅडिंग जेट्टी, वेस्टवॉटर ट्रिटमेंट प्लाण्ट, रेडिओ अ‍ॅॅण्ड कम्युनिकेशन सेंटर, फिश प्रोसेसर, शीतगृह, मासळी लिलाव आणि विक्री केंद्र, इंधनासाठी डिझेल पंप, इत्यादी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली होती.च्या बंदरावर आधारित छोटे-मोठे अनेक उद्योग- व्यवसाय परिसरात उभे राहणार आहेत. यामुळे २५ हजार नागरिक, व्यावसायिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी मुंबईच्या ससून डॉक बंदराऐवजी करंजा बंदरात लॅण्ड होतील.निधीअभावी रखडलेल्या करंजा बंदराचे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि करंजा मच्छीमार संस्था कामासाठी सर्वतोपरी मदत, प्रयत्न करीत आहेत. बंदराच्या कामासाठी विलंब होणार नाही, पुन्हा थांबणार नाही याची दक्षता शासन घेईलच अशी अपेक्षा आहे.- भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था

टॅग्स :thaneठाणेRaigadरायगड