बाप रे बाप, कोर्टातील न्यायाधीशांनाच चावला साप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:27 IST2018-09-04T15:25:48+5:302018-09-04T15:27:59+5:30

दैनिक कामकाजाप्रमाणे आज सकाळी न्यायाधीश सी.पी. काशीद न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात येऊन दालनात बसल्यानंतर काही वेळातच काशीद साहेबांच्या हाताला साप चावला.

Baba Rai Baba, Chawla serpent in the court | बाप रे बाप, कोर्टातील न्यायाधीशांनाच चावला साप 

बाप रे बाप, कोर्टातील न्यायाधीशांनाच चावला साप 

पनवेल - पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी.पी.काशीद यांना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोर्टात साप चावल्याची घटना घडली. धामण जातीचा हा साप असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती कळताच न्यायालयातीलच सर्पमित्राला बोलाविण्यात आले होते. त्यानंतर, सर्पमित्र अॅड. दीपक ठाकूर यांनी स्वतः हा साप पकडला.

दैनिक कामकाजाप्रमाणे आज सकाळी न्यायाधीश सी.पी. काशीद न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात येऊन दालनात बसल्यानंतर काही वेळातच काशीद साहेबांच्या हाताला साप चावला. त्यानंतर, सापाच्या नावाने न्यायालय आवारात गोंधळ सुरू झाला. या घटनेची माहिती, वकिल आर.के.पाटील यांना मिळताच त्यांनी सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर याना बोलवले. अॅड. दिपक ठाकूर यांनी साप ताब्यात घेतला. तसेच हा साप बिनविषारी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे न्यायधीशांसह न्यायालयातील वकिलांचाही जीव भांड्यात पडला.

Web Title: Baba Rai Baba, Chawla serpent in the court