शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Atal Bihari Vajpayee : ग्वाल्हेरच्या वाड्यात जनसंघाच्या बैठका, रघुजीराजे आंग्रे यांनी दिला आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:31 AM

राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली.

- जयंत धुळपअलिबाग - राजकारणात ज्यांचा आदर्श समोर ठेवावा अशी फार थोडी माणसे सध्या आहेत. त्यातील विख्यात अभ्यासू, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत चेहरा म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असल्याची भावुक प्रतिक्रिया सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ग्वाल्हेरमधील बालपणीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांचे बंधू बृजबिहारी वाजपेयी हे ग्वाल्हेरमधील आमच्या संभाजी विलास वाड्याच्या शेजारीच राहायला होते. माझे मोठे काका सरदार संभाजीराजे आंग्रे आणि त्यांचा अत्यंत घनिष्ट स्नेह होता. माझ्या बालपणी अटलबिहारी वाजपेयी, राजमाता विजयाराजे शिंदे ही सारी त्या वेळची जनसंघाची मंडळी संभाजी विलास वाड्यात आवर्जून येत असत.ग्वाल्हेरच्या संभाजी विलास वाड्यात धोतर, कुडता, जोडे आणि उंच काळे मोजे घालून येणारी व्यक्ती किती महान आहे, हे समजायला वयाची १२ वर्षे जावी लागली. राजमाता विजयाराजे शिंदे, थोरले काका सरदार संभाजीराजे, बाबा यांच्याशी गप्पांत रंगणारे कविमनाचा राजकारणी भारतीय राजकारणातील मातब्बर होते.

रोह्यात १९८२ मध्ये वाजपेयींबरोबर लाभला सहवासअटलबिहारी वाजपेयी यांचा एक तासाचा सहवास अलिबागचे नंदकुमार चाळके व त्यांचे आणीबाणीतील सहकारी गिरीश तुळपुळे यांना रोहा येथे १९८२ मध्ये लाभला. तत्कालीन संघाचे ज्येष्ठ सदस्य माधवराव वैद्य यांच्या निवासस्थानी वाजपेयी यांच्या समवेत भेट झाली होती.राजकारण, साहित्य, कविता, समाजकारण, संस्कृती, इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या वेळी अलिबागमध्ये आम्ही संघ विचाराच्या एका साप्ताहिकाचे काम करीत होतो. त्याच साप्ताहिकाचा अटलजींवरील विशेषांक केला होता. त्याचे प्रकाशन त्यांनी केले. संपूर्ण अंकातील मजकूर जाणून घेतला आणि दिलेली शाब्बासकीची थाप आजही स्मरणात असल्याचे चाळके सांगतात.वाजपेयी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभल्याने त्यांची वैचारिक प्रगल्भता अनुभवल्याने आयुष्यच बदलून गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असताना नाशिक कारागृहात एक महिना तर ठाणे कारागृहात १२ महिने असा एकूण १३ महिने कारावास भोगला. अटलजींचे साहित्य मनात घर करून गेल्याचेही त्यांनी अखेरीस सांगितले.

अटलबिहारी वाजपेयी विरुद्ध माधवराव शिंदे ग्वाल्हेरची निवडणूकवाजपेयी हे वारंवार ग्वाल्हेरमध्ये येत असत आणि त्यांच्या बैठका वाड्यात होत. त्या वेळी ग्वाल्हेर हा अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदार संघ होता. १९८३ मध्ये वाजपेयी यांनी माधवराव शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ती निवडणूक आणि त्या वेळच्या प्रचाराची धामधूम आजही स्मरणात असल्याचे रघुजीराजे यांनी सांगितले.माझ्या उपनयन सोहळ््यासाठी अटलबिहारी येणार होते, परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यानंतर आवर्जून ते भेटण्यासाठी वाड्यात आले होते. माझी शेंडी हातात घेऊन दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही दिले होते.- रघुजीराजे आंग्रेदेशासाठी समर्पित जीवन जगणारे राजकारणातील अटल नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पार्टीचेच नव्हे, तर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे.- रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगडपराकोटीची संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, देशाने उत्तम संसदपटू गमावला आहे.- आमदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षकणखर आणि सहृदयी नेता भारताने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने भाजपाबरोबरच देशाची प्रचंड हानी झाली आहे. लाल बहादूर शास्त्रींच्या पठडीतील अटलजींनी, ‘जय जवान, जय किसानच्या जोडीला जय विज्ञान’ची जोड देऊन देशाच्या प्रगतीला दिशा दिली.- आमदार प्रशांत ठाकूरप्रतिभावंत, प्रगल्भ, सर्वसमावेशक, मानवतावादी, राजकीय विचारसरणीचे, अजातशत्रू असे नेते आपल्यातून गेले आहेत. खंबीर कवी मनाचा माणूस असूनही प्रयोगशील राष्ट्रीय धोरणाने त्यांनी आंतरराष्ट्रीय छाप पाडली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.- सतीश धारप, रायगड उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई