हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:53 IST2018-12-05T05:53:34+5:302018-12-05T05:53:39+5:30

महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

The arrest of a worker who fired in the air | हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक

बिरवाडी : महाड तालुक्यातील पंदेरी येथील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सयाजी जाधव याने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलादपूर तालुक्यातील पैठण व महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथून अन्य दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी सयाजीने विनापरवाना दोन बोअर बंदुकीने सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी राजेश माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
आरोपींच्या चौकशीनुसार महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील महेंद्र महामुणकर व पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील सुभाष मोरे (६६) यांना ताब्यात घेतले आहे.
सयाजीविरोधात महाड तालुका व महाड एमआयडीसी पोलिसांत जमीन खरेदी - विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी सतरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

Web Title: The arrest of a worker who fired in the air