अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

By निखिल म्हात्रे | Updated: August 23, 2024 10:32 IST2024-08-23T10:31:44+5:302024-08-23T10:32:07+5:30

गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत...

Alibaug Police Raid International Call Centre  | अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

अलिबाग - येथील परहूर गावात आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर अलिबागपोलिसांनी छापा टाकला आहे. साधारणपणे ५० जणांची सखोल चौकशी रात्री पासून सुरु आहे. सध्या या व्यवसायात आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का? याची पडताळणी पोलिस करत आहेत. पोलिस मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.

गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत. सतत अशा गाड्या उभ्या असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांनी दिली. त्यानंतर नेचर्स एज अलिबाग रीसॉर्टवर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली.
गुरुवारी संध्याकाळी नेचर्स एज अलिबाग रीसॉर्टवर अलिबाग पोलिसांनी छापा टाकून अंदाजीत ५० जणांची पोलिस चौकशी सुरू केली आहे. तर तेथील कॉल सेंटर साठी वापरण्यात आलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Web Title: Alibaug Police Raid International Call Centre