शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला, लग्ने लाॅकडाऊन, जिल्ह्यात सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:01 IST

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे.

निखिल म्हात्रे -  अलिबाग : दरवर्षी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त मिळावा म्हणून आतुरतेने वाट पहात असलेले वधू-वराचे पिता यावर्षी हा मुहूर्त टाळताना दिसत आहेत. जिल्हाभरातील जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी अकय्य तृतीया हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते. लग्न समारंभ, वास्तुपूजन, धार्मिक पूजा, नामकरण विधी, नवीन दुकानाचे उद्घाटन आदींसह विविध महत्त्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला प्रशासनाने वेगळी नियमावली लावली आहे. केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत व कोविडचे नियम पाळून दोन तासांच्या आत लग्नकार्य आटपावे लागत आहे. जिल्ह्यात कोविड नियमांचे पालन करून काही गावात लग्नकार्य करण्यात आली आहेत.लग्न सोहळ्यांमध्ये वधू-वर मंडळींकडून वारेमाप खर्च होत असतो. त्यामुळे आता २० माणसात लग्न सोहळे पार पडत असल्याने खर्चही कमी झाला आहे. तसेच कोरोना विषाणूचे सावट अधिक बळावत असल्याने यावर्षी कोरोनामुळे सर्वच समाजाच्या विवाह सोहळ्यांना पूर्णतः ब्रेक लागला आहे.

नियमांचा अडसर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून रीतसर परवानगी मागावी लागत आहे. वधू-वरांना तहसील कार्यालयात आवश्यक ते दस्तावेज सादर करून अर्ज करून परवानगी घ्यावी लागत आहे. यात कोणत्या गावातील किती नातेवाईक उपस्थित राहतील, याची माहिती द्यावी लागते. 

मे महिन्याच्या अखेरपर्यंत  संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन  लाॅकडाऊन संपल्यावर जून ते जुलै महिन्यात आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. लग्नकार्य जुळून आलेल्या संबंधित कुटुंबांना लाॅकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे.- सुधीर पाटील, वधू पिता

 लग्न जुळल्यावर किती दिवस प्रतीक्षा करायची, असे म्हणत अनेक वधू - वर विवाह बंधनात अडकले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत १०० वर विवाह सोहळे पार पडले आहेत. यातील बहुतांश लोकांनी मंगल कार्यालयाऐवजी घरीच हे सोहळे आटोपले आहेत.- दीपक भगत, वरपिता

कार्यालयांचे गणित बिघडले मर्यादा आल्याने मंगल कार्यालय व्यवसायावर परिणाम झाला आहे. २५ लोकांसाठी कार्यालय बुक करणे वर-वधूच्या कुटुंबीयांना परवडत नाही. घरच्या घरी विवाह कार्य पार पाडले जात आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसmarriageलग्न