शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुरुड तालुक्यातील शेती गेली पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 2:16 AM

शेतकरी चिंतेत : एका दिवसात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद

मुरुड : तालुक्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवार ३ सप्टेंबर रोजी फक्त एका दिवसात १८५ मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. तहसील कार्यालयामार्फत बुधवारी सकाळी आठ वाजता पाऊस मोजण्यात आला, त्यावेळी सर्वात विक्रमी पाऊस मुरुड तालुक्यात पडला असल्याचे कळवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात आतापर्यंत ३२९९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला. बघता बघता पावसाने तीन हजारचा टप्पा पार केला आहे. बुधवारी पावसाचा जोर कायम असून शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आलेले सर्व भात पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचले होते. बाजारपेठ, आझाद चौक, अंजुमन हायस्कूल, गोलबंगला व अन्य ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.गणपती उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक खरेदी करण्यासाठी बाजारात आले असता मुसळधार पावसाने ते गावात जाण्यासाठी अडकून पडले होते. दीड दिवसाचे गणपती विसर्जन हे सुद्धा पावसात भिजत जाऊन करण्यात आले. त्यामुळे पडणाऱ्या या सतत धार पावसाळा स्थानिक जनता हैराण झाली आहे. पाऊस सारखाच सुरु असल्याने पावसाचे पाणी निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शेतामधील पाणी सुद्धा कमी न होता ते वाढतच आहे. कारण पाऊस विश्रांती घेत नसल्याने पाण्याचे प्रमाण वाढतच चालेले आहे. आंबोली धरण दुथडी भरून वाहत आहे. हे धोरण ओव्हरपलो झाले असून त्यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे.यंदाच्या या पावसात मुरुड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुरुड शहरातील बाजारपेठे भागात तर गटारांची खोदाईच झाली नाही.त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबल्याने रस्तेसुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होत आहेत.गटार खोदाईचे दरवर्षी लाखो रुपयांचा ठेका काढला जातो परंतु गटारांची खोदाईच बरोबर केली जात नाही. गटारांची खोदाई करत असताना नगरपरिषदेचा कोणताही अधिकारी उपस्थित न राहिल्याने संबंधित ठेकेदाराने काम बरोबर न करता पैसे लाटण्याचे काम के लेअसल्याचा आरोप फकजी यांनी के ला.मुरुड तालुक्यात मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. परंतु कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. सर्वाना सतर्कतेचे आव्हान करण्यात आले आहे. भालगाव मार्गावर एक वृक्ष उन्मळून पडला होता, तो सुद्धा बाजूला हटवण्यात येऊन वाहतूक सुरु केली आहे.- परीक्षीत पाटील, तहसीलदारमुरुड भालगाव मार्गे रोहा या रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने येथील वाहतूक ठप्प आहे. आमच्या आगारातून खाजणी पुलापर्यंत बस सुरू आहे.- युवराज कदम,आगार प्रमुख,मुरु ड

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडRainपाऊसFarmerशेतकरी