शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

वर्षपूर्तीनंतरही पनवेलकरांचे प्रश्न जैसे थे! घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:21 AM

पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबरला वर्षपूर्ती. एक वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांचे सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त ठोस काहीही साध्य करता आलेले नाही. घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

- वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महापालिकेची १ आॅक्टोबरला वर्षपूर्ती. एक वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांचे सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त ठोस काहीही साध्य करता आलेले नाही. घनकच-यासह आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रशासनाने प्रसिद्धी मिळविली असली, तरी दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्यामध्ये मात्र अपयश आले आहे. विकासाची गती वाढविली नाही, तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सिडको, नगरपालिका, एमआयडीसी व ग्रामपंचायतीमध्ये विभागलेल्या पनवेल तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाने १ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेची घोषणा केली. महापालिकेमुळे विकासाला गती मिळेल व दर्जेदार नागरी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली होती. आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पदभार स्वीकारताच मनपा क्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांवर व अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात केली. प्रशासनाच्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा निर्माण झाली; परंतु प्रशासनाच्या कामाचा धडाका फेरीवाले हटविण्यापुरताच मर्यादित राहिला. अतिक्रमणे वगळता इतर नागरी सुविधांकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे आयुक्तांच्या कामाचा करिश्माही कमी होत गेला. एका वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात शासन व प्रशासनाला यश आले. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महापौर व उपमहापौरांची निवडणूक वेळेत झाली असली तरी स्थायी समितीसह इतर समित्यांची निवड अद्याप झालेली नसल्याने लोकप्रतिनिधींनाही अपेक्षित गतीने काम करता आलेले नाही. महापालिकेची स्थापना होण्यापूर्वी ज्या समस्या होत्या त्याच एका वर्षानंतरही जैसे थे आहेत. यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. नागरिकांच्या मनामध्ये पालिकेविषयी नाराजी वाढू लागली असून, नाराजी दूर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.घनकचरा व्यवस्थापन हा महापालिकेसमोरील गंभीर प्रश्न आहे. शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. जागोजागी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. गावठाण परिसरातील स्थिती सर्वात गंभीर आहे. नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाही अद्याप उपलब्ध करून देता येत नाहीत. नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय ते प्रमुख रुग्णालयाची यंत्रणा उभी करण्यासाठी ठोस काहीही झालेले नाही. सिडकोकडून नोड हस्तांतरणाला प्राधान्य दिले असले, तरी अत्यावश्यक सेवा हस्तांतर करण्यास विलंब केला जात आहे. पूर्ण महापालिकेसाठी घनकचरा व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, गटार या सुविधा देण्यासाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे. अग्निशमन यंत्रणा फक्त नावापुरतीच आहे. महापालिका स्थापनेचे पहिले वर्ष असल्याने प्रचंड गैरसोयी होऊनही नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली नाही. अशीच स्थिती राहिली तर मात्र महापालिका व सत्ताधाºयांविरोधातही नागरिक रोडवर उतरण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एक वर्षामध्ये झालेली कामेअनधिकृत फेरीवाले हटविण्यामध्ये यशदुकानदारांचे मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमण हटविलेअनधिकृत झोपड्यांसह, होर्डिंगवरही कारवाईमहापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्यामध्ये यशएक वर्षामधील महापालिकेचे अपयशघनकचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा नाहीआरोग्य यंत्रणा उपलब्ध करून देण्यात अपयशअग्निशमन यंत्रणेसाठी ठोस उपाययोजना नाहीआपत्कालीन आराखडाही बनविला नाहीस्थापनेपासूनच्या महत्त्वाच्या घटना१ आॅक्टोबर २०१६ रोजी महापालिकेची स्थापना; महापालिका आयुक्तपदावर डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती.नोव्हेंबर २०१६ - २३ ग्रामपंचायतींमधील जवळपास ४०० कर्मचाºयांचे पगार रखडले.१ जानेवारी २०१७ - महापालिका क्षेत्रामध्ये एलबीटी६ फेब्रुवारी २०१७ - २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचाºयांचा आंदोलनाचा इशारा.२१ फेब्रुवारी २०१७ - खारघरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करताना आयुक्त शिंदेंशी व्यापाºयांनी हुज्जत घातली.१६ मार्च २०१७ - आयुक्त सुधाकर शिंदे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली व राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती.१९ एप्रिल २०१७ - निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर.२४ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीसाठी मतदान.२६ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीची मतमोजणी.३१ मे २०१७ - आयुक्तपदावर डॉ. सुधाकर शिंदे यांची पुन्हा नियुक्ती.१० जुलै २०१७ - महापौरपदी कविता चौतमोल व उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची निवड.पालिकेमार्फत हागणदारीमुक्त मोहीम राबविण्यात आली. कचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. याकरिता पालिका क्षेत्रात कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणासंदर्भातही महत्त्वाचे पाऊल पालिका उचलणार आहे. पनवेल महापालिकेला एक सक्षम पालिका करण्याचा मानस आहे.- डॉ. कविता चौतमोल,महापौर,पनवेल महापाालिकापनवेल महापालिका स्वच्छ, सुंदर, स्मार्ट बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याकरिता विविध उपाययोजना राबवत आहोत. पालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट हा घनकचरा व्यवस्थापन आहे. याकरिता नागरिकांनी घनकचºयाचे आपल्या स्तरावर वर्गीकरण केल्यास, पालिकेला याकरिता येणाºया खर्चात बचत होणार आहे. त्याचा वापर इतर ठिकाणी करता येणार आहे. सध्या अतिशय कमी मनुष्यबळात पालिकेचा कारभार सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू आहे.- डॉ. सुधाकर शिंदे,आयुक्त, पनवेल महापालिकालोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने एकमेकांशी समन्वय साधून काम करावे. पालिका निर्मितीसाठी रहिवाशांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, पालिकेला अग्रेसर बनविण्यास प्रयत्न केले पाहिजेत. आमदार म्हणून मी नेहमीच सहकार्य देत राहीन.- प्रशांत ठाकूर,आमदारघरातून बंगल्यात राहायला गेल्यावर समाधान वाटते. मात्र, पालिकेचा वर्षभराचा कारभार पाहिला असता, बंगल्यापेक्षा घरच चांगले होते, असे वाटायला लागले आहे. पालिकेच्या निर्मितीला कुठे तरी घाई केली असल्याचे दिसून येत आहे. नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत. पाणी, कचरा यापैकी कोणताच विषय सुटलेला नसून, वर्षभराचा कारभार नाराज करणाराच आहे.- प्रीतम म्हात्रे, गटनेता शेकाप