नागोठणेत वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: August 8, 2015 22:01 IST2015-08-08T22:01:14+5:302015-08-08T22:01:14+5:30
शहरासह विभागातील तरु णमंडळींकडून दुचाकी वाहने चालविण्याचे सध्या पेव फुटले आहे. यात अनेक अल्पवयीन असून काही तरु णांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही

नागोठणेत वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई
नागोठणे : शहरासह विभागातील तरु णमंडळींकडून दुचाकी वाहने चालविण्याचे सध्या पेव फुटले आहे. यात अनेक अल्पवयीन असून काही तरु णांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ते शहरात बेफाम वेगात मोटारसायकली चालवीत असून सध्या ट्रिपलसीट चालविण्याचे सुद्धा फॅड तयार झाले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नागोठणे पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेत कारवाई केली.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर व पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारीवर्गाने शिवाजी चौकात नाकाबंदी करून अनेक दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला. पोलिसांनी केलेल्या धडक मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून गांधी चौक, खुमाचा नाका, जोगेश्वरी मंदिर परिसर, बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलाकडे जाणारा मार्ग आदी भागांत ही मोहीम राबवून या धूमस्वारांवर चाप बसवावा, अशी मागणी नागरिकांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)