अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी 12 तासांच्या आत गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:00 IST2020-07-27T23:00:00+5:302020-07-27T23:00:28+5:30
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या आरोपीला 12 तासाच्या आत गजाआड करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणारा आरोपी 12 तासांच्या आत गजाआड
अलिबाग : रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या आरोपीला 12 तासाच्या आत गजाआड करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ताम्हन शेत गावच्या जवळ वावल्याचा कोंडाच्या मध्यभागी मोठय़ा दगडावर विवस्त्र मृतावस्थेत त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर
अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीला मारण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीच्या डोक्यात दोन जखमा झाल्या आहेत. हे
कळताच जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील विविध गुन्हे उघडकीस आणणा-या अधिका-यांचा हातखंडा असलेल्या 8 टीम तयार तपासाची सुत्र हलविण्यात आली. त्यानुसार आरोपी र्पयत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. घडलेल्या या सा-या प्रकणाची आरोपीने कबुली दिली आहे. तर पीडित मुलीचा मृतदेह मुंबई येथील जे. जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.