वाकण-पाली मार्गावर एसटीला अपघात, ट्रकने दिली धडक; २५ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:01 PM2020-01-16T23:01:05+5:302020-01-16T23:01:21+5:30

जखमींमध्ये बहुसंख्य विद्यार्थी

Accident, truck hit by ST on bend-shift route; 2 passengers injured | वाकण-पाली मार्गावर एसटीला अपघात, ट्रकने दिली धडक; २५ प्रवासी जखमी

वाकण-पाली मार्गावर एसटीला अपघात, ट्रकने दिली धडक; २५ प्रवासी जखमी

Next

नागोठणे : पेणहून पालीला जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाºया ट्रकने धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर २२ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा बहुतांश समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एम एच १४ बी टी १५६ क्रमांकाची एसटी बस नागोठणे बसस्थानकातून गुरु वारी सकाळी ८ वाजता सुटली होती; एसटी ८.१५ वाजण्याच्या सुमारास वाकण नाक्यावर थांबून पुढे पालीकडे रवाना झाली असता, समोरून वेड्यावाकड्या पद्धतीने वेगाने आलेल्या ट्रकने एसटीला जबरदस्त धडक दिली. त्यात एसटीतील प्रवासी जखमी झाले. अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे. या एसटीमधून दररोज सकाळी पालीतील जे. एन. पालीवाला महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या जादा असते व त्याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांचीच संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश लक्षणीय आहे.

जखमींना तातडीने नागोठणे प्राथमिक आरोग्यकेंद्र तसेच डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्रकचालक तसेच इतर तीन-चार प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबागचे शासकीय रुग्णालय तसेच नवी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील आरोग्यकेंद्रातील डॉक्टरांना मदत करण्यासाठी स्थानिक डॉ. सुनील पाटील, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. अभिषेक शहासने यांनी येथे दाखल होऊन जखमींवर उपचार केले. अपघातानंतर काही वेळातच रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, किरणकुमार सूर्यवंशी, एसटीच्या रोहा आगाराचे प्रमुख विकास पोकळे यांनी जखमींची भेट घेऊन चौकशी केली. एसटी महामंडळाकडून जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. या वेळी दिल्या जाणाºया तुटपुंजा रकमेबाबत जखमींचे नातेवाईक तसेच स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अपघाताची नागोठणे पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू करण्यात आला आहे.

जखमींची नावे
दत्ताराम मोरे (रा. शिलोशी), राणी माने (रा. बाहेरशीव), भाविका मढवी (रा. निडी), गृहती डाकी (रा. शेतपळस), कीर्ती चोगले (रा. पांडापूर), प्रज्वल घासे (रा. शेतपळस), हेमा पिंगळा (रा. गंगावणे), नीतेश सुतार (रा.मेढा), प्रिया भोईर (रा. कोलेटी), पूजा म्हात्रे - बसवाहक (रा. कोप्रोली, पेण), जय नावले (रा. बाळसई), त्रिवेणी पाटील (रा. मुंढाणी), प्रिया गदमले (रा. शिहू), रेश्मा खाडे (रा. तरशेत), स्नेहा पाटील (रा. शिहू ), मुरलीधर देशमुख, ट्रकचालक (रा. खोपोली ), शशिकांत चोगले (रा. पांडापूर), हषार्ली बडे (रा. कोलेटी), प्राजक्ता डाकी (रा. शेतपळस), अंजली दि. जाधव (रा. नागोठणे), किरण मांडेर (रा. महागाव), साहिल जंगम (रा. बाळसई), पोपट खेडकर, बसचालक (रा. पेण) आणि ललिता जांभळे (रा. पळस), हर्षाली मलख.

Web Title: Accident, truck hit by ST on bend-shift route; 2 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात