मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरमध्ये अपघात; दोन गाड्यांची समोरासमोर धडक, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:04 IST2020-10-16T00:04:43+5:302020-10-16T00:04:56+5:30
अतिवेगात, बेदरकारपणे चालवून पोलादपूर बाजूकडून येणाऱ्या प्रवीण मोरे यांच्या व्हॅगनर गाडीच्या रॉंग साईटला जाऊन समोरून धडक दिली.

मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरमध्ये अपघात; दोन गाड्यांची समोरासमोर धडक, एक जखमी
पोलादपूर : विनापास प्रवासाला परवानगी मिळाल्यानंतर महामार्गावर वाहनाची संख्या वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. १४ ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील मौजे भोगाव गावच्या जवळ इनोव्हा कार व मारुती व्हॅगनार यांच्यात सामोरा समोर धडक होऊन अपघात झाला. यात व्हॅगनार चालक किरकोळ जखमी झाला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
१४ ऑक्टोबर रोजी प्रवीण राजाराम मोरे (रा. कातळी बंगला ता. पोलादपूर) हे त्यांच्या ताब्यातील व्हॅगनार गाडी क्रमांक एम.एच. ०६-ए.एस. ६७२५ ही मुंबई-गोवा महामार्गावर महाड ते कातळी बंगला, पळचील (ता. पोलादपूर) अशी स्वत: चालवित घेऊन जात असताना कशेडी घाट, मौजे भोगाव गावचे हद्दीत आल्यावेळी रत्नागिरी बाजूकडून येणारी ईनोव्हा गाडी क्रमांक एम.एच. ०३ - ऐ.आर. ८६२० वरील चालकाने मौजे भोगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आल्यानंतर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अतिवेगात, बेदरकारपणे चालवून पोलादपूर बाजूकडून येणाऱ्या प्रवीण मोरे यांच्या व्हॅगनर गाडीच्या रॉंग साईटला जाऊन समोरून धडक दिली. अपघातामध्ये मोरे किरकोळ जखमी झाले. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना. मोरे हे करीत आहेत.