मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अन् डंपरचा भीषण अपघात; १८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:16 IST2023-05-09T12:55:28+5:302023-05-09T13:16:30+5:30

मुंबई महाबळेश्वरवरुन एसटी बस महाडकडे येत असताना महाड शहराच्याजवळ नाते खिंड येथे कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला.

Accident involving ST bus and dumper on Mumbai-Goa highway; 18 passengers injured | मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अन् डंपरचा भीषण अपघात; १८ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अन् डंपरचा भीषण अपघात; १८ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहराजवळ एसटी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या डंपरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान होऊन एकूण १८ प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे.  

मुंबई महाबळेश्वरवरुन एसटी बस महाडकडे येत असताना महाड शहराच्याजवळ नाते खिंड येथे कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. या अपघातात बसमधील एकूण २३ प्रवाशांपैकी चालक-वाहकासह एकूण १८ प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी झालेला आहे.  याप्रकरणी डंपर चालकचालक सिद्धार्थ राजेंद्र जंगम याला महाड पोलिसांनी अटक केली आहे.

अपघातात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये एसटी बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर  क्रेनच्या साह्याने वाहने हटविण्यात आल्यानंतर सुमारे एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Accident involving ST bus and dumper on Mumbai-Goa highway; 18 passengers injured