Accident: खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 13:39 IST2022-09-11T13:38:16+5:302022-09-11T13:39:22+5:30
Accident: अलिबाग तालुक्यातील खंडाळे नाका येथे समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक घरात घुसल्याने घराचे तसेच घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे

Accident: खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले
अलिबाग - तालुक्यातील खंडाळे नाका येथे समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक घरात घुसल्याने घराचे तसेच घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास या अपघाताची घटना घडली. साळाव येथील ट्रक पेण – अलिबाग रस्त्यावरुन जात होता. सदर ट्रक खंडाळे नाका येथे आला असता समोरून येणाऱ्या एका चार चाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या अमोल मोरे यांच्या घराच्या अंगणात घुसला. यावेळी घराचे मोठे नुकसान झाले. तसेच अंगणात उभी असलेल्या दुचाकीचे देखील नुकसान झाले.
या अपघातावेळी अमोल मोरे यांची आई आणि भाऊ घरातच झोपले होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सदर अपघात होताच ट्रक चालक पोलिस ठाण्यात हजर होत अपघाताची माहिती दिली.
आदल्या दिवशीच गणपती विसर्जन झाले असल्याने घरातील इतर सर्व मंडळी पनवेलला गेली होती. गणेशोत्सव काळात सर्वजण अंगणातच जागरण करीत असत जर त्यावेळी ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता अशी भीती मोरे यांनी व्यक्त केली.