भरधाव क्रेटा कारने एक रिक्षा, दोन दुचाकींना उडविले; तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 17:21 IST2024-05-15T17:19:54+5:302024-05-15T17:21:49+5:30
उरण-पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळच बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे.

भरधाव क्रेटा कारने एक रिक्षा, दोन दुचाकींना उडविले; तीन जखमी
मधुकर ठाकूर
उरण : क्रेटा कारने बरल दांपत्याचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी आणखी एका क्रेटा कारने एक रिक्षा व दोन स्कुटीना उडवले आहे.या अपघातात तीनही वाहनावरील तीनजण जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
उरण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळच बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला आहे. याच रस्त्यावरुन भरधाव वेगाने उरण शहराकडे निघाललेल्या एका सफेद रंगाच्या क्रेटाकारने बेदरकारपणे एका रिक्षा,आणि दोन दुचाकी अशा तीन वाहनांचा एकाच वेळी धडक दिली.या भीषण अपघातात तीनही वाहनातील तीन जण जखमी झाले आहेत. झालेल्या अपघातात रिक्षा आणि दोन दुचाकी रस्त्याबाहेर पलटी झालेल्या आहेत.क्रेटा चारचाकीसह स्कूटी व रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अपघात कसा आणि कशामुळे झाला याची माहिती उरण पोलिसांकडून घेतली जात आहे.
महिन्याभरापूर्वी जय घरत यांनी बराल पती-पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीला क्रेटा कारने चिरडले होते. त्यानंतर क्रेटाकारने रिक्षासह दोन दूचाकींना उडविण्याची आजची दुसरी घटना आहे.क्रेटा कार, रिक्षा चालक व दोन दुचाकी स्वारांची अथवा जखमींची कोणतीही फारशी माहिती याक्षणी तरी पोलिसांकडे उपलब्ध नाही.फक्त पोलिस माहिती घेत आहेत इतकेच पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.