शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 7:35 AM

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला.

कर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर मंगळवारी पहाटे भीषण व विचित्र अपघात झाला. कर्जतहून नेरळकडे जात असताना रेल्वे पुलाचा कठडा तोडून कार ३५ फूट खाली कोसळली. दुर्दैव असे की, याच वेळी रेल्वे रुळावरून एक मालगाडी जात होती. त्यावर ती कार आदळली. या अपघातात एका पत्रकारासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी असून, त्यातही एका पत्रकाराचा समावेश आहे. जखमींना प्रथमोपचार करून पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. संताेष सखाराम जाधव (३८, रा. नेरळ) आणि जयवंत रामचंद्र हबाळे (४३, रा. बेकरे) हे जखमी आहेत. अपघातात ठार झालेले धर्मानंद गायकवाड हे मूळचे कर्जत तालुक्यातील असून, ते नेरळमधील राजेंद्रगुरुनगरमध्ये वास्तव्यास होते. ते स्थानिक वर्तमानपत्रासाठी काम करीत होते. धर्मानंद हे नेरळ येथून आपले काम आटोपून मंगेश, नितीन या दोन मावस भावांसह व संताेष आणि जयवंत या मित्रांसमवेत कार (एमएच ४६ बीआर ४२६१) ने कर्जत-कल्याण राज्य मार्गावरून जात होते.  किरवली गावानजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची कार रेल्वे पुलाचे सुरक्षा कठडे तोडून ३५ फूट खाली कोसळली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी जात होती. कार त्या मालगाडीवर आदळली आणि तिघांनी आपला जीव गमावला.

मालगाडीचे तीन डबे झाले वेगळेहा अपघात इतका भीषण होता की, कार जोरात आपटल्याने मालगाडीच्या शेवटच्या तीन डब्यांचे दोन कपलिंग तुटले व धावणाऱ्या मालगाडीपासून तीन डबे वेगळे  झाले. या अपघाताची माहिती समजताच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग पहाटे चार ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत बंद होता. त्यानंतर रुळांची तपासणी करून रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला.

टॅग्स :Karjatकर्जतAccidentअपघात