नागोठणे शहरात ६४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:45 PM2019-10-21T23:45:28+5:302019-10-21T23:45:57+5:30

१९१ पेण मतदारसंघातील नागोठणे शहरात निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली.

64% voting nagothane city | नागोठणे शहरात ६४ टक्के मतदान

नागोठणे शहरात ६४ टक्के मतदान

Next

नागोठणे : १९१ पेण मतदारसंघातील नागोठणे शहरात निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरातील दहा मतदान केंद्रात ८,६९४ मतदार असून, त्यापैकी सोमवारी ५,६१४ मतदारांनी आपला हक्क बजावला. शहरातील मतदानाची टक्केवारी ६४.५९ टक्के इतकी झाली. शहरात सर्वात जास्त मतदान कचेरी शाळेतील २७६ या केंद्रात ७३.९२ टक्के, तर सर्वात कमी मतदान कन्याशाळेतील २८१ या केंद्रात ५७.३६ टक्के इतके झाले.

मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व मतदान केंद्र व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानानंतर पेण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटील, महाआघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे आणि इतर ११ उमेदवारांचे भवितव्य २४ आॅक्टोबरपर्यंत मतपेटीत बंद झाले. नागोठणे शहरातील सर्वच मतदान केंद्रात सकाळपासून मतदार तुरळक प्रमाणात मतदान करण्यासाठी येत असल्याचे दिसून आले.

दहा मतदान केंद्रांतील मतदानाची आकडेवारी-

केंद्र क्रमांक- मतदार- मतदान

२७२- (उर्दू शाळा)- १२५४- ८६५
२७३- (उर्दू शाळा)- ८९३- ६२६
२७४- (उर्दू हायस्कूल)- १०५०- ६९७
२७५- (उर्दू हायस्कूल)- ५४९- ४०५
२७६- (कचेरी शाळा)- ६०६- ४४८
२७७- (कचेरी शाळा)- ९४५- ५८९
२७८- (कचेरी शाळा-) ७०१- ३७०
२७९- (कन्या शाळा)- १०३५- ६६१
२८०- (कन्या शाळा)- ४९३- २८३
२८१- (कन्या शाळा)- ११६८- ६७०

Web Title: 64% voting nagothane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.