शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:49 IST

वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक.

मधुकर ठाकूर, उरण : वारंवार नोटिसा बजावल्यानंतरही मालमत्ता कराची थकबाकी भरण्यास दुर्लक्ष करणाऱ्या बोकडवीरा- उरण येथील मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनवर थकीत असलेल्या चार कोटी एक लाख २३ हजार ३९९ रुपयांच्या वसुलीसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीने मंगळवारी (१९) जप्तीची कारवाई केली.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायतीचे हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि.प्रकल्प उभारण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या कंपनीने भेंडखळ ग्रामपंचायतीची २०१६ पासून मालमत्ता कराची मागील सात वर्षांची एकूण चार कोटी एक लाख २३ हजार ३९९ रुपये थकबाकी आहे.थकबाकीच्या रकमेचा भरणा मुदतीत करण्यासाठी ग्रामपंचायतींने कंपनीला वारंवार नोटीसाही बजावल्या आहेत. त्याचबरोबर ७ नोव्हेंबर २०२३ रोजी थकबाकी भरण्यासाठी निर्वाणीचा इशारा देताना ३० दिवसात भरणा न केल्यास कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही बजावली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या नोटीसीला कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन प्रा.लि. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटिसालाही दाद देत नसल्याने अखेर मंगळवारी (१९) ग्राम विस्तार अधिकारी विनोद मिंडे, सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, सदस्य अजित ठाकूर, अभिजित ठाकूर, अक्षता ठाकूर, संगीता भगत,शितल ठाकूर,लिलेश्वर भगत, स्वाती ठाकूर,स्वाती घरत,प्राची पाटील, सोनाली ठाकूर आणि ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांच्या नेतृत्वाखाली भेंडखळ ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई केली आहे.संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या जप्तीच्या कारवाईनंतर मुजोर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लागलीच वठणीवर आली.टर्मिनल  व्यवस्थापक सोमन मुर्मू यांनी नांगी टाकत वरिष्ठांशी चर्चा करून मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम एका महिन्याच्या मुदतीत भरण्याची लेखी पत्राद्वारे हमी दिली आहे.महिन्यात थकबाकीचा भरणा न केल्यास पुन्हा एकदा प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा सरपंच मंजिता पाटील यांनी प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे.

टॅग्स :Raigadरायगड