शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पेणमधील हेटवणे-शहापाडा जलवाहिनीसाठी ३० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:20 AM

- दत्ता म्हात्रे पेण : पेण खारेपाटातील दक्षिण व उत्तर शहापाडा पाणी योजनेतील वाशी व वडखळ येथील पाणीटंचाईचा प्रश्न ...

- दत्ता म्हात्रेपेण : पेण खारेपाटातील दक्षिण व उत्तर शहापाडा पाणी योजनेतील वाशी व वडखळ येथील पाणीटंचाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी नुकतीच आमदार धैर्यशील पाटील यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीमधे ३० कोटी निधी मंजुरीची हेटवणे ते शहापाडा धरण जोडणारी १९ किलोमीटर अंतरावरील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती ठेकेदाराकडून घेण्यात आली. हे काम जानेवारीत पूर्ण होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे वाशी, वडखळमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.खारेपाटातील २७ गावे व वाड्यांना या योजनेंतर्गत पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खारेपाटातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट लवकरच थांबेल आणि पाणीटंचाईची समस्या कायमची निकाली निघेल, असा विश्वास ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे.आढावा बैठकीत योजनेच्या कामाची माहिती घेताना आ. पाटील यांनी, हेटवणे धरण ते शहापाडा धरण या १९ कि.मी अंतरामधील पाइपलाइनचे काम प्रगतिपथावरआहे व निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर काम पूर्ण झाले असून शहापाडा धरणापर्यंतच्या जलवाहिनीचे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणारआहे.आढावा बैठकीत वाशी विभागातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.फेब्रुवारीतपाणीपुरवठा !हेटवणे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी सतत शहापाडा धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेचा वापर करून शहापाडा धरणाचा पाणीसाठा वाढून उत्तर योजनेतील २७ गावे वाड्यांना मुबलक पाणी मिळेल.वाशी व मसद शिर्की या दोन विभागात वितरीत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे कामही जानेवारी महिन्यातच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.त्यादृष्टीने शीघ्रगतीने काम सुरू असल्याचे बैठकीत ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित हेटवण्याची गंगा लवकरच खारेपाटात अवतरेल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड