शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रायगड : वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा, 3 बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 6:52 AM

विषबाधा झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

- नितीन भावेखोपोली - वास्तूशांतीच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कल्याणी शिंगोले (वय 7 वर्ष ), ऋषिकेश शिंदे (वय 12 वर्ष ) आणि प्रगती शिंदे ( वय 13 वर्ष) या तीन लहानग्यांचा विषबाधेमुळे दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 ते 16 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पनवेलमधील एमजीएम, डीवाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती,  सायन या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यात आले आहे.  खालापूर तालुक्यातील देवन्हावे  येथील सुभाष रामचंद्र माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम सोमवार (18 जून) पार पडला. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण तयार झाले. सर्व पदार्थ घरातच बनवण्यात आले होते.  दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली जेवणाची पंगत रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होती. साधारणता 250 जणांचे जेवण बनवण्यात आले होते. 

कार्यक्रम संपल्यानंतर अचानक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माने यांच्या पत्नी व मुलीला उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. यानंतर  महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतू, एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झाल्यानं सर्वांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये सर्वच रुग्णांवर प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ  होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रुग्णांवर उपचार करणं शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला.  

'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला, अन्यथा मृतांचा आकडा अजूनही वाढला असता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उरलेले जेवण तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे महड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

पत्नीचा त्रास पाहिला, अन्...सध्या उपचार सुरू असलेल्यांमध्ये अनिता गायकवाड (वय 45 वर्ष) आणि निकिता गायकवाड (वय 17 वर्ष) या मायलेकींचाही समावेश आहे. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अनिता यांचे पती नवनाथ गायकवाड  यांनी पत्नी व मुलीला होत असलेला त्रास पाहून स्वतःहून उलट्या करुन खाललेले अन्न बाहेर काढले. त्यामुळे आपल्याला विषबाधेचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडfood poisoningअन्नातून विषबाधा