शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बांधायची हाेती २७१ घरे, मात्र दाेन वर्षांत बांधली फक्त ६६; तळीयेच्या दरडग्रस्तांच्या दारी आपलं शासन येणार तरी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 9:20 AM

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दरडग्रस्त तळीये गावाचे शासनामार्फत पुनर्वसन करण्यात येत आहे. म्हाडामार्फत २७१ घरे बांधली जात आहेत. मात्र ६६ घरे बांधून देतानाच म्हाडाची दमछाक झाली आहे. उर्वरित घरांसाठी अजून किती वाट पाहावी लागणार, असा सवाल तळीयेकर करीत आहेत. २१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. यात ९० जणांचा मृत्यू झाला आणि पूर्ण गाव दरडीखाली गेले होते.

६६ घरांची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात घराबाहेरील सुविधांची कामे अपूर्णच आहेत. घराबाहेरील पिचिंग, ड्रेनेज आणि इतर कामांसाठी निधी मंजूर नसल्याने ही कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यापूर्वी तळीयेकरांचा गृहप्रवेश होईल, असे जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिले होते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गृहप्रवेश लांबणीवर गेला आहे. वृत्तपत्रांनी यावर आवाज उठविल्यानंतर अखेर ६६ घरांची लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आलेली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरले असून, यंदाचा पावसाळा कंटेनरमध्ये राहूनच काढावा लागत आहे. शासन, प्रशासनाने तळीयेमध्ये येऊन आम्ही कसे राहतो हे पाहावे, अशी संतप्त भावनाही ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. 

पावसाळ्यात घराच्या पायाची दुरवस्था झाल्याचेही समोर आले आहे. दोन्ही घरांच्या मध्ये पिचिंग केले नसल्याने तसेच रस्ताही नसल्याने असुविधाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा अर्धवट काम केलेल्या घरांमध्ये राहायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच बांधण्यात आलेली आधुनिक पद्धतीची घरे ही ग्रामस्थांना अडचणीची ठरत आहेत. ग्रामस्थांनी पारंपरिक घरे देण्याबाबत मागणी प्रशासनाकडे केलेली आहे.

रस्ते, पाणीपुरवठ्याचे काय?६६ घरांची कामे पूर्ण झाली असली तरी जिल्हा परिषदेमार्फत होणारे रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची कामे अपूर्ण राहिली आहेत. दोन वर्षांपासून दरडग्रस्त कुटुंबे कंटेनरमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेली सुविधाही अपुरी आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलन