रायगड लोकसभा मतदार संघात २१ उमेदवारी अर्ज वैध

By निखिल म्हात्रे | Published: April 20, 2024 09:04 PM2024-04-20T21:04:50+5:302024-04-20T21:05:36+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

21 candidature applications are valid in Raigad Lok Sabha Constituency | रायगड लोकसभा मतदार संघात २१ उमेदवारी अर्ज वैध

रायगड लोकसभा मतदार संघात २१ उमेदवारी अर्ज वैध

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात २८ जणांनी ४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे २७ अर्ज वैध ठरले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, उमेदवार, उमेदवारांचे सूचक, वकील व प्रतिनिधी उपस्थित होते.

छाननी अंती रायगड लोकसभा मतदारसंघात अनिकेत सुनील तटकरे, नरेश गजानन पाटील (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते, घाग संजय अर्जुन,(अपक्ष) या सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. तर, अनंत गंगाराम गीते ( उद्धवसेना), अनंत गीते (अपक्ष), अनंत बाळोजी गीते(अपक्ष), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष), आस्वाद जयदास पाटील (अपक्ष), मंगेश पद्मा कोळी (अपक्ष), पांडुरंग दामोदर चौले,(अपक्ष), सुनील दत्तात्रेय तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), विजय गोपाळ बना (अपक्ष), प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी), सुनील दत्ताराम तटकरी (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), अभिजित अजित कडवे (अपक्ष), अजय यशवंत उपाध्ये (अपक्ष), अस्मिता एकनाथ उंदिरे (अपक्ष), अंजली अश्विन केळकर (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), अमित श्रीपाल कवाडे (अपक्ष), मिलिंद काशिनाथ कांबळे, नंदकुमार गोपाळ रघुवीर, कुमोदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

Web Title: 21 candidature applications are valid in Raigad Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.