शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आठ हजार अपघातात २००० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:18 PM

आठ वर्षांत वाढल्या दुर्घटना; नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज

- निखील म्हात्रेअलिबाग : वाहनांची सातत्याने वाढत जाणारी संख्या, विविध मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वेगाने धावणारी वाहने यांचा एकत्रित परिणाम अपघाताला निमंत्रण ठरत आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत एकूण आठ हजार ९०८ अपघात झाले आहेत. यामध्ये दोन हजार २२६ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. विविध उपाययोजना करूनही अपघात रोखण्यात म्हणावे तसे यश आले नसल्याने प्रभावी उपाय राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे, यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणीही करण्यात येते. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. एवढे प्रयत्न करूनही अपघातांची संख्या कमी करण्यात म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.काही पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना दुचाकी घेऊन देतात. कधी-कधी काही मुलांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. वाहतुकीच्या नियमांचीही माहिती नसते. त्यामुळे आजची तरुण पिढी अतिवेगाने आणि बेदरकार वाहने चालवतात, त्यामुळे त्यांचे अपघात होतात. त्याला पोलीस यंत्रणा किती पुरी पडणार, असा प्रश्न उदय भोसले या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित के ला.जमेची बाजूजानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण होताना दिसत असले, तरी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ७१८ रस्ते अपघात झाले, त्यामध्ये १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.अपघाताची प्रमुख कारणेमहामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणेरस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहनेरस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणेकोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसºया बाजूला नेणेधोकादायक वळणेमद्य पिऊन वाहन चालविणे७०% निष्काळजीपणे वाहन चालविणे8% पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा7% रस्त्याची सदोष बांधणी6% खड्डे9% अन्य कारणेअपघात कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना, जनजागृती करण्यात येत आहे; परंतु वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघातांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा मृत्यू होत आहे अथवा त्यांना अपंगत्व येत आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांचा कोणता हट्ट पुरवायचा, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगडजिल्ह्यात झालेले अपघातवर्ष      अपघात   मृत्यू२०१२    १३९४     ३४२२०१३    १२५९     ३२१२०१४    १२६१     ३२८२०१५    १४२३    ३५७२०१६    ११५१    २५४२०१७    ९०४      २३०२०१८    ७९८     २४४२०१९    ७१८      १६१

टॅग्स :Accidentअपघात