मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:48 AM2019-05-20T10:48:27+5:302019-05-20T10:48:59+5:30

अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.

2 dead and over 20 passengers were injured after 2 buses collided on Mumbai-Pune highway in Khalapur, Raigad. | मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Next

रायगड : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ खासगी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी बसमधून प्रवासी सहलीसाठी वसईहून महाबळेश्वरला जात होते. यावेळी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 



 

Web Title: 2 dead and over 20 passengers were injured after 2 buses collided on Mumbai-Pune highway in Khalapur, Raigad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात