शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

१,५६१ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत, ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:06 IST

महाडमध्ये १ कोटी ७५ लाख रुपये वाटप : ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित

दासगाव : महाड तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागा कडून करण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. तालुक्यातील ३० गावांतील शेतकरी अद्याप वंचित राहिले आहेत. आतापर्यंत जवळपास १ कोटी ७५ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत जाहीर झाली आहे.

या वर्षी लांबलेल्या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. संपूर्ण राज्यामध्ये या वर्षीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडून शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शेतकºयांना प्रति हेक्टर ८ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अवेळी पाऊस आणि परतीच्या पावसाने महाड तालुक्यामध्ये ८ हजार ५८६ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रथम टप्पा म्हणून २ कोटी २८ लाख १७ हजार १८२ रुपये नुकसानभरपाई दाखल झाली. तालुक्यांमध्ये सुमारे ८ हजार ५८६ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती महाड तालुका कृषी विभागाने दिली आहे. तालुक्यांतील अतिदुर्गम भागांमध्येही भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले.सुरुवातीच्या अवेळी पावसामध्येही शेतकºयांचे नुकसान झाले होते. यातील अनेक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. महाड तालुक्यातील जवळपास १ हजार ५६१ शेतकरी वंचित असल्याची माहिती महाड महसूल विभागाने दिली आहे. या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना ५३ लाख ४ हजार ४९० रुपये येणे अपेक्षित आहे.१महाड तालुका कृषी विभाग आणि महसूल विभागातर्फे तालुक्यातील भातशेतीची पाहणी करण्यात आल्यानंतर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. २ हजार ४०० शेतकºयांच्या शेताचे पंचनामे करण्यात आले असले तरी सुमारे ८ हजार शेतकºयांच्या भाताचे नुकसान झाले आहे. यापैकी ७०२५ शेतकºयांना १ कोटी ७५ लाख १२ हजार ६९३ रुपये वाटप झाले आहे.२महाड तालुक्याचा बहुतांशी भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून त्यातील बरीचशी शेती डोंगर उतारावर आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे शेतीचे क्षेत्र कमी आहे. यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकºयांना गुंठा ८० रुपयेच मिळणार आहेत. तालुक्यातील २०३ शेतकºयांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. हा विमा अ‍ॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडून उतविण्यांत आला आहे. मात्र ज्यांना नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे त्यांना विम्याची रक्कम मिळणार नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरी