शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या १३३ जागा रिक्त

By admin | Updated: August 9, 2015 23:24 IST

नुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा

आविष्कार देसाई ,अलिबागनुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा अद्यापही रिकाम्याच राहिल्या आहेत. या जागांसाठी आवश्यक असणारे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्या-त्या आरक्षणातील उमेदवारांना आपल्या जातीचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा करता येणार नसल्याचे समोर आले आहे.आरक्षणातील उमेदवारांनी आतापासूनच जातीचे प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असले, तरी महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र प्रशासनाकडून प्राप्तच होत नाही. तर काहीजण जातीचे प्रमाणपत्रच काढून घेत नाहीत. त्यामुळे बहुतांश जागांवर हा घोळ सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला मतदानाचा मूलभूत हक्क दिला आहे. त्याचप्रमाणे निवडणूक लढविण्याचाही हक्क दिला आहे. ग्रामपंचायतपासून ते लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सत्ता संघर्ष सुरु असतो. सर्वांना न्याय मिळावा, सर्वच समाजाचा सर्वसमावेशक विकास व्हावा, यासाठीच लोकशाही पध्दतीने होणाऱ्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भटक्या जमाती, यासह खुल्या वर्गासाठीही आरक्षण ठेवले जाते. एखाद्या विशिष्ट जाती अथवा जमातीवर अन्याय होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. या आरक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडे जात वैधता प्रमाण असणे आवश्यक असते. ते नसल्यास त्या उमेदवाराला निवडणूक लढविता येत नाही. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, माणगाव आणि महाड या तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमधील ८० प्रभागामध्ये २१३ सदस्य निवडून द्यावयाचे होते. जातीचे प्रमाणपत्र नसल्याने महाड तालुक्यात आरक्षणातील दोन जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे पेण, पनवेल, उरण, माणगाव, सुधागड, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतींमध्ये १३० जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. विविध आरक्षणातील ११३ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महाड तालुक्यातील सर्वाधिक ५८ जागांचा समावेश आहे. त्याखालोखाल श्रीवर्धन -२३, माणगाव - ११, म्हसळा-७, पेण- ६, पनवेल- ५, उरण- २ आणि सुधागड तालुक्यातील एक जागा रिक्त राहिली आहे.दरम्यान, जातीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आरक्षणातील जागा अशाच वर्षानुवर्षे रिक्तच राहणार आहेत. याबाबत प्रशासन, सरकार आणि निवडणूक आयोगाने यातून मार्ग काढण्याची गरज आहे.