शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील अंगणवाड्यांचे १२८ प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 05:07 IST

अंगणवाड्यांचे वर्ग : खासगी जागा, ग्रामपंचायत कार्यालयांमधून सुरू आहेत

सिकंदर अनवारे 

दासगाव : महाड तालुक्यातील अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने अंगणवाड्या आजदेखील खासगी, सार्वजनिक ठिकाणी भरवल्या जात आहेत. गेली अनेक वर्षात निधी प्राप्त होत नसल्याने जवळपास २२ प्रस्ताव प्रलंबित आहेत. महाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी जागेत भरवल्या जात असलेल्या एकूण १२८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीपासून वंचित आहेत.

शासनाच्या एकात्मिक बाल विकास विभागाकडून बालकांच्या विकासाकरिता अंगणवाड्या चालवल्या जातात. या अंगणवाड्यांमुळे ग्रामीण भागातील बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया, बालकांचे आरोग्य, बालकांचा विकास याबाबत विशेष करून लक्ष दिले जाते. याकरिता सकस आहाराबरोबरच वैद्यकीय तपासणी, कुपोषणमुक्त असे उपक्र म देखील राबवले जातात. मात्र या अंगणवाड्यांना स्वत:च्या अशा इमारतीच गेली अनेक वर्षे उपलब्ध नाहीत. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आज देखील अनेक अंगणवाड्या या खासगी, सार्वजनिक ठिकाणी भरवल्या जात आहेत.महाड तालुक्यात ३१0 अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांमधून ८,९५0 इतकी बालकांची पटसंख्या आहे. काही ठिकाणी महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र काही गावांत अनेक तांत्रिक अडचणीमुळे अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीपासून वंचित आहेत.महाड हा ग्रामीण आणि दुर्गम तालुका आहे. तालुक्यातील बालकांना त्यांच्या प्राथमिक विकासाकरिता अंगणवाडी हा मुख्य स्रोत आहे. केवळ बालकांचाच विकास नाही तर महिलांच्या विकासाकरिता आणि त्यांच्या आरोग्याकरिता देखील महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तालुक्यात वारंवार अंगणवाड्यांचे प्रस्ताव पाठवून देखील शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गेली काही वर्षापासून २२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महाडमध्ये १८२ अंगणवाड्यांपैकी १२८ अंगणवाड्या या खासगी मालकीच्या जागेत किंवा ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर आदी ठिकाणी भरवल्या जात आहेत.ग्रामीण भागात अंगणवाड्यांबाबत उदासीनताचच्ग्रामीण भागात ग्रामपंचायत किंवा स्थानिक पातळीवरून विविध ठिकाणी पैसा खर्च केला जातो. अनेक वेळा विविध सार्वजनिक इमारतींच्या कामांकरिता निधी देखील गोळा केला जातो. मात्र, ज्या अंगणवाड्या किंवा प्राथमिक शाळांमधून बालकांचा विकास होत असतो त्या अंगणवाड्या किंवा प्राथमिक शाळांबाबत मात्र गावकरी किंवा गावातील राजकीय पुढारी उदासीनता दाखवत आहेत. विविध सामाजिक देणग्यांतून अशा इमारती बांधल्या गेल्यास बालकांचा विकास होण्यास मदतच होणार आहे. महिला बालकल्याण विभागाने देखील याबाबत विचार करून अंगणवाड्यांच्या इमारतीबाबत निधी उपलब्ध करून देणे.बालके असुरक्षितचच्महाड तालुका हा दुर्गम आणि वाडीवस्त्यांमध्ये वसलेला आहे. ग्रामीण भागात असलेले सार्वजनिक मालकीच्या इमारती किंवा ग्रामपंचायत कार्यालये ही गावापासून लांब किंवा साफसफाई नसलेल्या ठिकाणी असतात.च्गवताने वेढलेल्या या इमारतींमध्ये बालकांच्या अंगणवाड्या भरवल्या जातात. अनेक इमारतींमध्ये पंखे किंवा वीज देखील उपलब्ध नसते. शिवाय अशा ठिकाणीच सकस आहाराचे धान्य देखील ठेवले जाते. यामुळे अशा इमारतींमध्ये बालकांचा विकास असुरक्षितच आहे. 

टॅग्स :Raigadरायगड