शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

रायगडला तातडीची १०० कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:48 IST

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची १०० कोटींची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. रायगड जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठीही लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळामुळे रायगडला बसलेल्या तडाख्याची पाहणी करत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर नियोजन भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पर्यावरण दिनीच पर्यावरणाची पडझड पाहिली. ‘निसर्ग’चे रौद्ररूप रायगडवासीयांनी थेट अनुभवले. मी पॅकेज जाहीर करणार नाही. पॅकेज हा घासून पुसलेला शब्द आहे, असा टोला लगावून ते म्हणाले, नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम प्रशासनाने लगेचच सुरू केले आहे. त्याचा संपूर्ण तपशील मिळेपर्यंत किमान आठ दिवस लागतील. त्यानंतर किती आर्थिक मदत करायची, याचा निर्णय घेऊ. नुकसानीची ठोस आकडेवारी आल्यावरच केंद्राकडे मदत मागणार आहे. चक्रीवादळ येण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. जीवितहानी होऊ न देणे हे प्रामुख्याने प्रशासनाचे काम असते. तरीही कोकणात सहा जणांचा मृत्यू झाला. विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडलेले अलिबागच्या उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे (५८) यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून चार लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

असे वादळ सव्वाशे वर्षांनी...रायगड आणि वादळ हे समीकरण जिल्ह्यासाठी अजिबात नवे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाला वादळे कशी पचवायची हे माहिती आहे. परंतु हे चक्रीवादळ सव्वाशे वर्षांनी आले आणि ते रायगडावर धडकले. सध्या वादळाचा धोका टळला असला तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

मुख्यमंत्र्यांचे आदेशरोगराई पसरू नये, यासाठी तातडीने स्वच्छता करा. आपत्तीत ज्यांची घरे, गोठे, शेती, बागायतीची हानी झाली आहे, त्या उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची सोय करणार.अशा वादळांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरांची बांधणी कशी असावी याचे नियोजन करणार.सर्वाधिक नुकसान विजेच्या खाबांचे. घरांचीही पडझड आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरविणार.वादळामुळे ज्यांचा अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तोही सोडविणार.

नुकसानीचे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यावेळी ग्राह्यपावसाळा तोंडावर असल्याने नुकसान झालेल्यांनी नुकसानीचे फोटो-व्हिडीओ काढून ठेवावेत. शारीरिक अंतर पाळत स्वच्छता करून घ्यावी. हे फोटो-व्हिडीओ पंचनाम्यात ग्राह्य धरण्यात येतील.

 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे