शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ZP President Election: झेडपीला मिळणार अध्यक्ष-उपाध्यक्ष, आज होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:10 IST

अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

पुणे : जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुणेजिल्हा परिषदेला अखेर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहेत. या पदांसाठी आज (दि. १८) निवडणूक होत असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत ही प्रक्रिया पार पडणार आहे.

अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर तुषार थोरात यांनीही पदासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.  नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ७३ पैकी ५१ गट जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १०, उद्धवसेना ६, शिंदेसेना ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ अशा जागांचे बलाबल आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

अध्यक्षपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित असल्याने अनुभवी सदस्याला संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अध्यक्ष निवडीनंतर लगेचच प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.

उपाध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू असून मुळशीचे शांताराम इंगवले, शिरूरच्या मोनिका हरगुडे, मावळ तालुक्यातील राऊत तसेच आंबेगावचे विष्णू हिंगे यांच्या नावांची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांच्याकडे पदाधिकारी निवडीचे अधिकार देण्यात आले असून त्यांनी जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा केल्याची माहिती आहे.

आज सकाळी पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अंतिम नावे निश्चित केली जाणार आहेत.

आजची निवडणूक प्रक्रिया

सकाळी ११ ते दुपारी १: उमेदवारी अर्ज दाखल

दुपारी ३ वाजता: विशेष सभेला सुरुवात

अर्ज छाननी : सभेतच अर्जांची पडताळणी

माघार : १५ मिनिटांचा वेळ

अंतिम निवड : एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास हात उंचावून मतदान

English
हिंदी सारांश
Web Title : Pune ZP to get President, Vice-President; Election today.

Web Summary : Pune Zilla Parishad elects its President and Vice-President today after four years. Nationalist Congress Party holds majority. Key contenders are Viradhawal Jagdale for President and Shantaram Ingwale for Vice-President. Final names will be decided in party meeting.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेzpजिल्हा परिषदMaharashtraमहाराष्ट्रZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६