शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या कामात जिल्हा परिषदेची उदासिनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 21:33 IST

जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे

ठळक मुद्देलघु पाटबंधारे विभागाचे केवळ ३३ टक्के काम पूर्णपुणे जिल्ह्यातील कृषी विभागाकडे सर्वाधिक २ हजार ७६९ कामे प्रस्तावित जलयुक्तची प्रस्तावित कामे सुरू करण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध

पुणे: जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. या दोन्ही विभागांकडे सोपविण्यात आलेली अनेक कामे रखडली आहेत. तसेच जलसंपदा पुणे पाटबंधारे विभागाकडे प्रस्तावित केलेल्या कामांपैकी एकही काम झालेले नाही.सततचा दुष्काळ आणि पाणी टंचाई यावर उपाय योजना म्हणून राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले.स्वयंसेवी संस्थांनी या कामात मोठे योगदान दिले आहे.तसेच काही शासकीय कार्यालयांनी सुध्दा या कामात पुढाकार घेतला आहे.पुणे जिल्ह्यातील कृषी विभागाकडे सर्वाधिक २ हजार ७६९ कामे प्रस्तावित करण्यात आली होती.कृषी विभागाने त्यातील २,५३० कामे पूर्ण केली आहेत.तर पुणे पाटबंधारे विभागाकडे 7 कामे प्रस्तावित केली होती.त्यातील एकही काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.पुणे,भोर,जुन्नर येथील वनविभाग,समाजिक वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे सूपूर्द करण्यात आलेली १०० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.वन विभागाने एकूण १ हजार १३३ कामे केली असून भूजलतर्फे ४४० कामे पूर्ण करण्यात आली.मात्र,विभागातील ३६५ कामे अजूनही अपूर्ण आहेत.जिल्हा प्रशासनाकडून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र,काही शेतकरीच जलयुक्तची प्रस्तावित कामे सुरू करण्यास विरोध करत आहेत. शेतक-यांच्या जमिनींमधून ट्रक किंवा जेसीबी जात असल्याने काही नागरिक ही कामे सुरू करू देत नाहीत.त्यामुळे बहुतेक कामे रखडली आहेत,असे जिल्हा प्रशासनातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे. नाला खोलीकरण,शेततळी,लघु बंधारे,बांध बंदिस्त करणे,सिंमेंट बंधारे,पाझर तलाव,विहरी बोअरवेल पुनर्रभरण यंत्रणा आदी कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत केली जातात.या योजने अंतर्गत प्रामुख्याने पावसाचे पाणी गावातच जिरवून भूजल पाणी पातळीत वाढ करण्यावर भर दिला जात आहे.मात्र,जिल्हा परिषदेच्या विभागांकडून त्यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.-------------------

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीJalyukt Shivarजलयुक्त शिवारzpजिल्हा परिषद