शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर!

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: November 15, 2023 19:38 IST

पुण्यातील येरवडा परिसरात एक 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डासांपासून होणाऱ्या झिका या आजराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.

पुणे :

पुण्यातील येरवडा परिसरात एक 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला डासांपासून होणाऱ्या झिका या आजराची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. याची दखल घेत आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना झिका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिच्या रक्ताचा नमुना 10 नोव्हेम्बर ला पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) ला पाठवला. 11 नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. 

यानुसार दि. 15 नोव्हेंबर रोजी साथरोग विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सिंह सारणीकर यांनी झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिक नगर येरवडा येथे प्रत्यक्ष रुग्णाची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घेणे बाबत सांगितले. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका येथील कर्मचारी यांना झिका रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आदेश दिले.

एक 64 वर्षाची येरवडा येथील महिला झिका साठी पॉझिटिव्ह आढळली. तिला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. तिचा झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती 15 ऑक्टोबर ला केरळ ला गेली होती, तेव्हा तिला झिका ची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत.  - डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग

टॅग्स :Zika Virusझिका वायरस